पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. १६९ तेषां शानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥ उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् । आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥ बहूनां जन्मनामंते ज्ञानवान्मा प्रपद्यते।। वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥१९॥ प्राप्त करून घेण्याची इच्छा बाळगणारे, अर्थार्थी म्ह. द्रव्यादिक काम्य वासना मनांत ठेवणारे. आणि ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान होऊन कृतार्थ झाल्यामुळे पुढे काही मिळवावयाचे नसले तरी निष्काम बुद्धीने भक्ति करणारे. (१७) यांपैकी एकभक्ति म्हणजे अनन्यभावें माझी भक्ति करणारा व नेहमीच युक्त झणजे निष्कामबुद्धीने वागणारा, असा जो ज्ञानी स्याची योग्यता विशेष होय ! ज्ञान्याला मी अत्यंत प्रिय, च ज्ञानी मला (अत्यंत) प्रिय आहे. (१८) सर्वच हे भक्त उदार मणजे चांगले होत; पण ( त्यांतल्या सांत) ज्ञानी म्हणजे मीच असे माझे मत आहे. कारण युक्त वित होत्साता ( सर्वांची) उत्तमोत्तम गति जो मी त्या माश्याच ठायीं तो स्थिरावलेला असतो. (१९) अनेक जन्मानंतर " जे काही आहे ते वासुदेव आहे" असें अनुभवास येऊन ज्ञानवान् मला येऊन पोचत असतो, असा महात्मा अत्यंत दुर्मिळ होय. । [प्रकृति व पुरुष ही दोन्ही माझींच रूपे व मीच चोहोकडे एक. स्वाने भरलेला आहे असे आपल्या स्वरूपाचे क्षराक्षरदृष्टया ज्ञान सांगून, स्याबरोबरच या स्वरूपानी भक्ति केल्याने परमेश्वराची ओळख होते असें जे भगवंतांनी वर सांगितले त्यांतील तात्पर्य नीट लक्षात घेतले पाहिजे. उपासना सांसच पाहिजे; मग ती व्यक्ताची करा अगर अव्यक्ताची करा; पण या दोहोंत व्यक्तोपासना सुलभ असल्यामुळे तिचेच येथे वर्णन आहे; तिलाच भक्ति असें नांव आहे. तथापि स्वार्थबुद्धि मनांत ठेवून