पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. कामैस्तैस्तैहतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः । काही विशिष्ट हेतूस्तव परमेश्वराची भक्ति करणे, ही भक्तिची पायरी कानिष्ट असुन, परमेश्वराचे ज्ञान व्हावे अशा हेतुनें भक्ति करणारे (जिज्ञासु) देखील कथेच समजले पाहिजेत; कारण त्यांचे ज्ञान अद्याप परिपूर्ण नसते, हे त्यांच्या जिज्ञासुस्वावस्थेवरूनच व्यक्त होते. तथापि हे सर्व भक्ति करणारे असल्यामुळे सर्वच उदार ह्मणजे चांगल्या मार्गाने जाणारे, असें हाटले आहे (श्लोक. १८). पण याच्याहि पुढे जाऊन झणजे ज्ञानप्राप्तीने कृतार्थ होऊन या जगांत ज्यांना करावयाचे किंवा मिळवावयाचे शिल्लक उरले नाही (गी. ३.१७-१९), ते ज्ञानी पुरुष निष्काम बुद्धीने जी भक्ति करितात (भाग. १.७.१०)ती सर्वांत श्रेष्ठ होय असे पहिल्या तीन श्लोकांचे तात्पर्य आहे. प्रल्हादनारदा दिकांची भक्ति याच श्रेष्ठ वर्गात पडत्ये आणि याचमुळे " भक्तियोग म्हणजे परमेश्वराची निहतुक व निरंतर भक्ति" असें भागवतांत भक्तीचे लक्षण केले आहे (भाग. ३.२९.१२; व गीतार. प्र. १३ पृ. ४०८ पहा.). 'एकभाक्तिः' व 'वासुदेवः' अशी जी १७ व्या व १९ व्या श्लोकांत पदे आहेत सी भागवतधर्मातल आहेत किंबहुना भकाचे वरील सर्व वर्णम भागवतधर्मातलेच आहे, असें झणण्याला हरकत नाही. कारण महाभारतांत या धर्माचे वर्णन चालू असतां-- चतुर्विधा मम जना भक्ता एवं हि मे श्रुतम् । तेषामेकान्तिनः श्रेष्ठा ये चैधानन्यदेवताः ॥ अहमेव गतिस्तेषां निराशीः कर्मकारिणाम् ॥ ये च शिष्टासयो भक्ताः फलकामा हि ते मताः । __ सर्वे च्यवनधर्मास्ते प्रतिबुद्धस्तु श्रेष्ठभाक् ॥ याप्रमाणे (म. भा. शां. ३४१.३३-३५) चतुर्विध भक्तांचा प्रथम उल्लेख करून नंतर अनन्यदैवत व एकांति ज्याप्रमाणे निराशीः . फलाशारहित कर्म करितो तसे इतर तीन भक्त न करिता काही तरी