पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. ११९ सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः । सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥३१॥ आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन । सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥ उवाच । FF योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । (३१) एकत्वबुद्धि म्हणजे सर्वभूतास्मैक्यबुद्धि मनांत ठेवून सर्व भूतांत असणान्या मला (परमेश्वराला) जो भजतो, तो (कर्म-) योगी सर्व प्रकारे वागत असताहि मजमध्ये असतो. (३२) हे अर्जुना ! सुख असो वा दुःख असो, आपल्याप्रमाणे इतरांना अशा (आत्मौपम्य.)ष्टीने जो सर्वत्र सारखें पाहूं लागला तो (कर्म-) योगी परम म्हणजे उत्कृष्ट मानिला जातो, । [सर्षीभूती एक आस्मा ही दृष्टि सांख्य आणि कर्मयोग या दोन्हीं मागांत सारखीच आहे; तसेंच पातंजल योगांतहि समाधी लागून पर- मेश्वराची ओळख झाल्यावर हीच साम्यावस्था प्राप्त होते. परंतु सांख्य आणि पातंजलयोगी या दोघांसहि सर्व कर्माचा त्याग इष्ट असल्यामुळे या साम्यबुद्धीचा उपवहारांत उपयोग करण्याचा प्रसंगच ते आणीत नाहीत; आणि गीतेतील कर्मयोगी तसे न करितां अध्यात्मज्ञानाने प्राप्त झालेल्या या साम्य बुद्धीचा व्यवहारांतहि नित्य उपयोग करून जगाची सर्व कामें लोकसंग्रहार्थ करीत असतोहा या दोहोंत मोठा भेद आहे, आणि म्हणूनच तपस्वी म्हणजे पातंजलयोगी व ज्ञानी म्हणजे सांख्यमार्गी या दोहोंपेक्षां कर्मयोगी श्रेष्ठ असें या अध्यायाचे अखेर (श्लोक ४६) स्पष्ट म्हटले आहे. हे साम्ययोगवर्णन ऐकून त्यावर अर्जुन आता अशी शंका घेतो की-]