पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० श्रीमद्भगवद्गीता. एतस्याहं न पश्यामि चंचलत्वास्थिति स्थिराम् ॥ ३३॥ चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।। ३४ ॥ श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौतेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५॥ असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६॥ अर्जुन म्हणाला-(३३) हे मधुसूदना ! साम्याने म्हणजे साम्य- बुद्धिने प्राप्त होणारा जो हा योग म्ह० कर्मयोग तुम्ही सांगितला तो (मनाच्या) चंचलपणामुळे कायम टिकेल असे मला दिसत नाही. (३४) कारण हे कृष्णा ! मन हे चंचल, दांडगे बालष्ठ व दृढ म्हणजे पळविण्यास कठिण आहे. वान्याप्रमाणे म्हणजे वायाची मोट बांधण्या- प्रमाणे याचा निग्रह करणे मला अत्यंत दुष्कर दिसते. _ [३३ व्या श्लोकांत ' साम्याने ' किंवा 'साम्य बुद्धीने ' प्राप्त होणारा या विशेषणाने योग ह्या शब्दाचा या ठिकाणी कर्मयोग असाच अर्थ होतो. पातंजल योगांतील समाधीचे जरी पूर्ण वर्णन आले असले तरी 'योग' शब्दानें पातंजल योग या श्लोकांतून विवक्षित नाहीं. कारण दुसन्या अध्यायांत “समत्वं योग उच्यते" (२. ४८)- "बुद्धीचा सारखेपणा किंवा समस्व यालाच योग म्हणतात" अशी कर्मयोगाची भगवंतांनीच व्याख्या दिली आहे. असो; अर्जुनाची अडचण कबूल करून भगवान् आतां असे सांगतात की-] श्रीभगवान् म्हणाले-(३५) में महाबाहो अर्जुना ! मन हे चंचल असून त्याचा निग्रह करणे दुर्घट, याबद्दल कांहींच शंका नाही; पण अभ्यासाने आणि वैराग्याने हे कौतया ! ते स्वाधीन ठविता येते. (३६) अंतःकरण ज्याच्या