पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $ सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥ यो मां पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥ म्हणजे झाले. हाच न्याय पुढील दोनतीन श्लोकांसहि लागू आहे. निर्वाण ब्रह्म सुखाचा याप्रमाणे अनुभव आल्यावर सर्वांभूती जी आत्मौ- पम्यदृष्टि उत्पन्न होते तिचे आतां वर्णन करितात-] (२९) ज्याचा आत्मा ( याप्रमाणे ) योगयुक्त झाला त्याची दृष्टि सर्वत्र सम होऊन सर्व भूतांच्या ठायी आपण आणि आपल्या ठायीं सर्व भूत (आहेत) असे त्याला दिसू लागते. (३०)मी (परमेश्वर परमात्मा) सर्व ठिकाणी ( आहे) असें जो पहातो, आणि माझ्या ठायीं सर्व अशी ज्याची दृष्टि झाली, त्याला मी कधी अंतरत नाही. आणि तोहि मला कधी अंतरत नाही. [या दोन श्लोकांपैकी पहिले वर्णन 'आत्मा' हा शब्द घालून अव्यक्त म्ह• अध्यात्मदृष्टया, व दुसरें प्रथमपुरुषदर्शक 'मी' हे पद घालून व्यक्त म्ह० भकिदृष्टया केलेले आहे. पण दोहाचा अर्थ एकच आहे (गीतार, प्र.३ पृ. १२७-४३० पहा). ही ब्रह्मात्मैक्यदृष्टिच मोक्ष व कर्मयोग या दोहोंचाहि पाया होय. २९ व्या श्लोकाचे पहिले । अर्ध घोड्या फरकाने मनुस्मृतींत (मनु. १२.९१) महाभारतांत (शा. २३८. २१ व २६८. २२), व उपनिषदांतहि (कैव. १.१०; ईश.६) आले आहे. किंबहुना सर्वभूतात्मक्यज्ञान हेच सर्व अध्यात्म्याचे व कर्मयोगाचे मूळ होय, असें गीतारहस्याच्या १२ व्या प्रकरणांत आम्ही सविस्तर दाखविले आहे (पृ. ३८४ वगैरे पहा), इंद्रियनिग्रह सिद्ध झाला तरी हे ज्ञान असल्याखेरीज तो फुकट आहे; व म्हणून परमेश्वराचे ज्ञान सांगण्यास पुढच्या अध्यायापासून सुरवात केली. - - - - - - - - - - - - - - - - आहे.]