पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. - - - - - - 5 प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ २७ ।। युंजन्नेवं सदाऽऽत्मानं योगी विगतकल्मषः । सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यंतं सुखमश्नुते ॥ २८ ॥ जिकडून जिकडून बाहेर फुटूं लागेल तिकडून तिकडून निरोध करून ते आरम्याच्याच ताब्यांत आणावे. । [मनाची समाधी करण्याच्या क्रियेचे हे वर्णन कठोपनिषदांतील रथोपमेने (कट. १.३.३)चांगले व्यक्त होते. रथाचे घोडे इकडेतिकडे जाऊ न देता उत्तम सारथी ज्याप्रमाणे त्यांना सरळ रस्त्याने घेऊन जातो त्यासारखाच प्रयत्न मनुष्याला समाधीसाठी करावा लागतो. मन कोणत्याही विषयावर स्थिर करण्याचाज्याला अभ्यास भाहे त्याला वरील श्लोकांतील मर्म ताबडतोब कळेल. मन एकीकडून आंव- रावयाला जावे तो दुसरीकडे फुटत असते; व हे बंद पडल्याखेरीज समाधी लागणे शक्य नाही. याप्रमाणे योगाभ्यासाने मन स्थिर केले झणजे जे फल मिळते त्याचे आतां वर्णन करितात--] (२७) या प्रकारे शान्तचित्त, रजोविरहित, विष्पाप व ब्रह्मभूत झालेल्या (कर्म-) योग्याला उत्तम सुख प्राप्त होते. (२८) याप्रमाणे सतत आपला योगाभ्यास करणारा (कर्म) योगी पापांपासून सुटून ब्रह्मासंयो- गापासून प्राप्त होणा-या अत्यंत सुखाचा सुखाने उपभोग घेतो । [या दोन श्लोकांत योगी म्हणजे कर्मयोगी असा आम्ही अर्थ केला आहे. कारण पातंजल योग तरी कर्मयोगाचे साधन म्हणून सांगितला असल्यामुळे पातंजल योगाचा अभ्यास करणारा हा पुरुष कर्मयोगीच विवक्षित आहे. तथापि योगी हाणजे समाधि लावून बसलेला पुरुष असा अर्थ घेतला तरी चालेल, गीतेतील प्रतिपाद्य मार्ग मात्र या पलीकडला आहे हे विसरले नाही