पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः ॥ ८ ॥ देहातील आत्मा हा सामान्यत: सुखदुःखोपाधींत मग्न झालेला आहे. पण इंद्रियसंयमनाने उपाधींचा जय केल्यावर हाच आरमा प्रसन होऊन परमात्मरूपी किंवा परमेश्वरस्वरूपी बनत असतो, पर- मात्मा ह्मणून आरम्याहून निराळ्या स्वरूपाचा पदार्थ नसून मनुष्याच्या शरीरांतील आत्माच तत्वतः परमात्मा आहे असे गीतेतच पुढे (गी. १३. २२ व ३१) ह्मटले असून महाभारतांतहि- आत्मा क्षेत्रज्ञ इत्युक्तः संयुक्तः प्राकृतैर्गुणैः । तैरेव तु विनिर्मुक्तः परमात्मेत्युदाहृतः ।। " आत्माच प्राकृत ह्मणजे प्रकृतीच्या गुणांनी (सुखदुःखादिक विकारांनी बन्द्र झालेला असला झणजे त्याला क्षेत्रज्ञ अथवा शरीरातील जीवात्मा असे म्हणतात; आणि या गुणांपासून त्याची सुटका झाली झणजे तोच परमात्मा होतो" असे वर्णन आहे (म. भा. शां. १८७, २४). अद्वैत वेदान्साचा सिद्धान्तहि हाच आहे हैं गीतारहस्याच्या ९ व्या प्रकरणा- वरून कळून येईल. गीतेत अद्वैत मत प्रतिपादन केलेले नसून विशिष्टा. द्वैत किंवा शुद्ध द्वैतच गीतेस ग्राह्य आहे असे ज्यांचे झणणे आहे ते 'परमात्मा' हे एक पद न घेता 'परं' आणि 'आत्मा' अशी दोन पदें करून 'परं' हे 'समाहितः' याचे क्रियाविशेषण समजतात! हा अर्थ क्लिष्ट आहे; परंतु या उदाहरणावरून सांप्रदायिक टीकाकार आपल्या मताप्रमाणे गीतेची कशी ओढाताण करीत असतात हे लक्ष्यात येईल. (4) ज्याचा आत्मा ज्ञानाने आणि विज्ञानाने म्हणजे विविध ज्ञानाने तृप्त झाला, ज्याने आपली इंद्रिये जिंकली, तो कूटस्थ म्हणजे मूळास जाऊन पोचला आणि माती, दगड व सोने सारखेच मानू लागला, अशा (कर्मः) योगी पुरुषास (च) 'युक्त-' सिद्धावस्थेस पोचलेला असे