पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. बंधुरात्माऽऽत्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६॥ $$ जितात्मनः प्रशस्तिस्य परमात्मा समाहितः । शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥ णच आपल्या स्वतःचा बंधु (ह्मणजे मदत करणारा), किंवा आपणच आपला शत्रु (म्हटला आहे). (६) ज्याने आपणच आपल्याला जिंकिलें तो आपल्या स्वतःचा बंधु होतो; पण जो आपल्पाला ओळखीत नाही त्याचे तो स्वतः- च शत्रूप्रमाणे वैर करितो. । [या दोन श्लोकांत आत्मस्वातंत्र्याचे वर्णन अपून ज्याने त्याने आपला सद्धार आपणच करून घेतला पाहिजे, व प्रकृति कितीहि बलवत्तर झाली तरी तिचा जय करून आत्मोन्नति करणे ही ज्याच्या त्याच्या स्वाधीनची गोष्ट आहे, हे तत्व प्रतिपादिले आहे (गीतार.प्र.१०पृ. २७४-२७९ पहा). हे तत्त्व मनांत चांगले ठसार्व म्हणून एकदा अन्वयाने म्हणजे आत्मा आपलाच मित्र केव्हा होतो ते आणि पुनः व्यतिरेकाने म्हणजे आत्मा आपला शत्र केव्हां म्हणावा ते सांगून, दोन्ही रीतींनी वर्णिले आहे व हेच तत्त्व पुनः १३.२८ श्लोकांतहि आले आहे. संस्कृतांत 'आत्मा' या शब्दाचे (1) अंत- रास्मा, (२) आपण स्वतः, आणि (३) अंत:करण किंवा मन, असे तिन्ही अर्थ असल्यामुळे आत्मा हा शब्द या व पुदील श्लोकांतून अनेक वेळी आला आहे. आतां आत्मा ताब्यांत आणिल्याने काय फल मिलते ते सांगतात--] (७) ज्याने आपला आत्मा झणजे अंतःकरण जिंकिले व ज्याला शान्ति प्राप्त झाली त्याचा परमात्मा'शीतोष्ण, सुखदु:ख आणि माना. पमान यांच्या ठिकाणी समाहित झणजे सम व स्थिर रहातो. । [या श्लोकांत परमात्मा' हा शब्द आरम्यालाच लाविला आहे,