पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० श्रीमद्भगवद्गीता. सुहृन्मित्रायुदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९ ॥ $ योगी युंजीत सततमात्मानं रहसि स्थितः । ____ एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥ म्हणतात. (९) सुहृद्, मित्र, शत्रु, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्यास योग्य व बांधव यांच्या ठायी आणि साधूंच्या व दुष्टांच्या ठायींहि ज्याची बुद्धि सम झालो तोच (पुरुष) विशेष योग्यतेचा म्हणावयाचा. [सुहृद् म्हणजे उलट उपकाराची इच्छा न ठेवितां मदत करणारा स्नेही, उदासीन ह्मणजे दोन पक्ष झाले असता कोणाचेंच बरे वाईट न इच्छिणारा; मध्यस्थ म्हणजे दोन्ही पक्षांचे बरे इच्छिणारा, आणि बंधु म्हणजे संबंधी, असे अर्थ टीकाकारांनी दिले आहेत. परंतु हेच अर्थ न घेतां थोड़े निराळे घेतले तरी चालतील. कारण हे शब्द प्रत्येकी भिन्न अर्थ दाखविण्यास योजिलेले नसून, सर्वाच्या मिलाफाने व्यापक अर्थाचा बोध व्हावा, स्यांत काही कमी पई नये, एवढ्याचसाठी अनेक शब्दांची ही योजना करीत असतात, याप्रमाणे योगी, योगारूढ किंवा युक्त कोणाला म्हणावे (गी. २. ६१; ४. १८; व ५. २३ पहा.) ते संक्षेपाने सांगून हा कर्मयोग सिद्ध करून घेण्यास प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे, त्यासाठी दुसऱ्याचे तोंडाकडे पहाण्याची कोणालाच जरूर नाही, असेंहि सांगितले. आता हा कर्म योग सिद्ध होण्यास साधन कोणते याचे निरूपण करितात-1 (१०) जो योगी म्हणजे कर्मयोगी आहे, त्याने एकांतांत एक्टें राहून चित्त व आत्मा आंवरून, कोणतीहि काम्यवासना न वितां, परिग्रह हरणजे पाश सोडून, सतत आपल्या योगाभ्यासास लागावें. . ['युंजीत' या पदाने पातंजलसूत्रांतील योग या ठिकाणी विवक्षित आहे हे पुढील लोकांवरून स्पष्ट होते. तथापि कर्मयोग प्राप्त करून घेऊ