पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - - - - गीता, भाषान्तर व टीपा--अध्याय ६. १३५ सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥४॥ 55 उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत् । . आत्मैवह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ।। ५ ।। सांपडेल तेथे काही तरी क्लृप्तीने गीतेतील मधल्याच एखाद्या श्लोकाचा संन्यासपर अर्थ लावणे योग्य नव्हे. गीता हल्ली पुष्कळांस दुर्बोध झाली आहे याचे कारणहि हेच होय, योगारूहाने कर्मे केली पाहिजेत हाच अर्थ पुढील श्लोकांतील व्याख्येवरूनहि न्यक्त होतो. तो श्लोक असा--] (५) कारण, जेव्हां इंद्रियांच्या (शब्दस्पर्शादि) विषयांच ठायीं व कर्माच्या ठायीं अनुषक्त होत नाही, आणि सर्व संकल्पाचा म्हणजे काम्य- बुद्धि रूप फलाशेचा (साक्षात् कर्माचा नव्हे) संन्यास करितो तेव्हां स्याला योगारूढ म्हणतात. हा श्लोक मागल्या किंबहुना पूर्वीच्या तीन श्लोकांनाहि जोडून आहे म्हटले तरी चालेल. यावरून योगारूढाने कमैं न सोडितां फलाशा किंवा काम्य बुद्धि सोडून शान्त चित्ताने निष्काम कर्मे करावयाची असा गीतेचा अभिप्राय स्पष्ट होतो. 'संकल्पाचा' संन्यास' हे शब्द वर दुसया श्लोकांत आलेले असून तेथे त्यांचा जो अर्थ आहे तोच या श्लोकांतहि घेतला पाहिजे. कर्मयोगांतच फलाशात्यागरूपी संन्या. साचा समावेश होत असुन फलाशा सोडून कम करणारा पुरुषच खरा संन्यासी व योगी म्हणजे योगारूद म्हणावयाचा. आतां अशा प्रकारचा निष्काम कर्मयोग किंवा फलाशासंन्यास सिद्ध होणे ही गोष्ट प्रत्येक मनुष्याच्या ताब्यांतील आहे, स्वतः होऊन प्रयत्न करील तर त्यास ती प्राप्त होणे अशक्य नाही, असे सांगतात-] (५) (मनुष्याने) आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण आपल्या स्वतःला (कधीहि) खचवू नये. कारण (प्रत्येक मनुष्य ) आप" - -- - - - - --- -- -- - -