पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः॥१॥ यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पांडव । ती ज्या साधनांनी प्रास होऊ शकत्ये त्यांच्या निरूपणास या अध्यायांत सुरवात केली आहे. तथापि हे निरूपण देखील पांतजलयोग स्वतंत्ररीत्या उपदेशिण्याकरितां केलेले नाही, हे लक्षांत यावे ह्मणून खरा संन्यासी म्हणजे फलाशा सोडून कमें करणारा पुरुष समजावयाचा, कमें सोडणारा नव्हे (५.३), इत्यादी पूर्वीच्या अध्यायांत जे प्रतिपादन केले आहे त्याचाच प्रथम येथें अनुवाद करितात--1 (१) कर्मफलाचा आश्रय न करितां (ह्मणजे फलाशेचें मनांत बिहाड न ठेवता)जो (शास्त्राप्रमाणे आपले विहित) कर्तव्यकर्मकारतो. तोच संन्यासी व तोच कर्मयोगी सणावयाचा. निरनी म्हणजे अग्निहोत्रा. दिक कमें सोडून देणारा किंधा अक्रिय झणजे कोणतेच कर्म न करितां स्वस्थ बसणारा (खरा संन्पासी व खरा योगी)नव्हे. (२) हे पांडवा ! ज्याला संन्यास असे म्हणतात तोच (कर्म-) योग समज. कारण संकल्पाच' महणजे काम्यबुद्धिरूप फलाशेचा संन्यास (-त्याग) केल्या. खेरीज कोणीहि (कर्म) योगी होत नाही. मागील अध्यायांत ' एक सांख्यं च योगं च" (५.५), अगर "योगाखेरीज संन्यास नाही" (५.६), किंवा " ज्ञेयः स नित्य- संन्यासी" (५.३), असें में हटले आहे त्याचाच हा अनुवाद असून पुढे अठराव्या अध्यायांत (१८.२) एकंदर विषयांचा उपसंहार करि- तांना हाच अर्थ पुनः वर्णिला आहे. गृहस्थाश्रमांत अग्निहोत्र राखून यज्ञयागादि करावे लागतात; पण जो संन्यासाश्रमी झाला त्याला याप्रमाणे अग्नि पाळण्याची. जरूर नसल्यामुळे त्याने निरग्नि' व्हावें व अरण्यांत राहून भिक्षेने उदर निर्वाह करावा, जगाच्या व्यवहारांत