पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. ११३ नयसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥२॥ पडूं नये, असे मनुस्मृतीने हटले आहे (मनु. ६. २५ इ.). मनूच्या या मताचाच पहिल्या श्लोकांत उल्लेख केलेला असून त्यावर भगवंतांच असें झणणे आहे की, निरमि व निष्क्रिय होणे हे कांहीं खन्या संन्या- साचे लक्षण नव्हे. काम्यबुद्धीचा किंवा फलाशेचा त्याग करणे हाच खरा संन्यास होय. संन्यास बुद्धीत आहे, अग्नि किंवा कमें सोडणे या बाह्य कियेत नाही. म्हणून फलाशेचा किंवा संकल्पाचा त्याग करून कर्तव्यकर्म करणारासच खरा संन्यासी हारले पाहिजे. हा गीतेचा सिद्धान्त स्मृतिकारांच्या सिद्धान्ताहून भिन्न असून त्याची स्मात मार्गाशी गीता एकवाक्यता कशी करिस्ये हे गीतारहस्याच्या ११ व्या प्रकरणांत (पृ. ३४३-३४७) स्पष्ट करून दाखविले आहे ते पहा. खरा संन्यास कोणता ते याप्रमाणे सांगून आतां ज्ञान होण्याच्या पूर्वी म्हणजे साधना- वस्थेत जी कमें करितात त्यांत. व ज्ञानोत्तर म्हणजे सिद्धावस्थेत फलाशा सोडून जी कमैं करावयाची त्यांत, भेद कोणता ते सांगतात-] (३) जो (कर्म-) योगारूढ होऊ इच्छितो त्या मुनीस कर्म है (शमा) कारण म्हणजे साधन म्हटले आहे; आणि तोच पुरुष योगारूढ म्हणजे पूर्ण योगी झाला म्हणजे त्यास (पुढे) शम है (कर्माचें) कारण होते, असें म्हणतात. [या श्लोकाच्या अर्थाचा टीकाकारांनी अनर्थ करून टाकला आहे. श्लोकाच्या पूर्वाधीत योग म्हणजे कर्मयोग हाच अर्थ असून तो सिद्ध होण्यास प्रथम कर्मच कारण होते ही गोष्ट सास मान्य आहे. पण "योगारूढ झाल्यावर त्यासच शम है कारण होते." याचा अर्थ टीकाकारांनी संन्यासपर लाविला आहे. त्यांचे असें ह्मणणे आहे की, 'शम'झणजे कर्माचा उपशम' व ज्याला योग सिद्ध झाला त्याने कमैं सोडून दिली पाहिजेत ! कारण त्यांच्या मतें कर्मयोग