पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर घटीपा-अध्याय ६. १३॥ याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतीस संन्यासयोग नावाचा पांचवा अध्याय समाप्त झाला. षष्ठोऽध्यायः। श्रीभगवानुवाच । अनाश्रितः कर्मफलं कार्य कर्म करोति यः। __ अध्याय सहावा. [मोक्ष प्राप्त होण्यास ज्ञानाखेरीज दुसऱ्या कशा ही अपेक्षा नसली तरी लोकसंग्रहाचे दृष्टीने ज्ञानी पुरुषाने ज्ञानोत्तरहि कर्मे केली पाहिजेत, पण ती बंधक होऊ नयेत अणून फलाशा सोडून समबुद्धीने करावी, यालाच कर्मयोग झणतात, आणि कर्मसंन्यासमागीपेक्षा हा अधिक श्रेयस्कर एवढे सिद्ध झाले. तथापि एवढ्याने कर्मयोगाचे प्रतिपादन संपत नाही. तिसन्याच अध्यायांत कामक्रोधादिकांचे वर्णन करितांना हे शत्र मनुष्यांची इंद्रियें, मन आणि बुद्धि यांत बिहाड करून त्याच्या ज्ञानवि- ज्ञानाचा नाश करितात (३.४०), ह्मणून इंद्रियनिग्रहाने यांचा तूं आधी जय कर असें भगवंतांनी अर्जुनास सांगितले आहे. हा उपदेश पुरा होण्यास (१) इंद्रियनिग्रह कसा करावा, आणि (२) ज्ञानविज्ञान समजे काय, या दोन प्रश्नांचा खुलासा करणे जरूर होते; परंतु मध्यंतरी अर्जुनाच्या प्रशां- वरून कर्मसंन्यास आणि कर्मयोग या दोहोंत अधिक चांगला मार्ग कोणता हे सांगून, या दोन मार्गाची शक्य तेवढी एकवाक्यताहि करून दाखविली, आणि कम न सोडितांहि तीच निःसंग बुद्धीने केल्या में ब्रह्मनिर्वाणरूपी मोक्ष कसा प्राप्त होतो हत्यादी प्रतिपादन केले. आता कर्मयोगासहि अवश्य लागणारी जीही नि:संग किंवा ब्रह्मनिष्ठ स्थिति