पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० श्रीमद्भगवद्वीता. न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्माणि स्थितः ॥२० ।। बाह्यस्पर्शेष्वसत्तात्मा विदंत्यात्मनि यत्सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते २१ ॥ ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते। आद्यंतवंतः कौतेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥ शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ २३ ॥ (२०) प्रिय म्हणजे इष्ट वस्तु प्राप्त झाली असतां आनंदून जाऊ नये, आणि अप्रिय प्राप्त झालं असतां खिन्नहि हो नये. (याप्रमाणे) ज्याची बुद्धि स्थिर, व जो मोह पावत नाही, तोच ब्रह्मवेत्ता ब्रह्माचे ठायीं स्थिर झाला (म्हणावयाचा ). (२१) बाह्य पदार्थांच्या (इंद्रि- यांशी होणान्या) संयोगांत म्हणजे विषयोपभोगांत ज्याचे मन आसक्त नाही, त्याला (च) आरम्यामध्ये में (काय) सुख आहे ते मिळते; व ब्रह्माशी मिळून युक्त झालेला तो पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो. (२२)(बाह्य पदार्थाच्या) संयोगामुळेच उत्पन्न होणारे जे भोग स्यांस आदि व अंत असल्यामुळे ते दुःखाचेंच कारण होत; त्यांचे ठायीं शहाणा पुरुष हे कौंतेया ! रत होत नाही. (२३) शरीर सुटण्यापूर्वी अर्थात आमरणान्त कामक्रोधामुळे होणारा वेग इहलोकीच सहन करण्यास (इंद्रियसंयमनाने ) प्रो समर्थ होतो, तोच मुक्त आणि तोच (खरा) सुखी पुरुष होय. [गीतेच्या दुसन्या अध्यायांत सुखदुःखें तुला सोशिला पाहिजेत असें जें भगवंतांनी झटले आहे (गी. २.१४) स्याचाच हा विस्तार व निरूपण आहे. गीता २.१४ यांत सुखदुःखांस 'आगमापायिनः 'हे