पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ५. - - - - - विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥ १०॥ इहैव तैर्जितः सा येषां साम्ये स्थितं मनः । निदोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९॥ (१८)जे पंडित म्हणजे ज्ञानी झाले त्यांची दृष्टि विद्याविनययुक्त ब्राह्मण, गाय, हत्ती, तसंच कुत्रा आणि चांडाल, या सर्वांच्या ठायीं समान असते ! (१९) याप्रमाणे ज्यांचे मन साम्यावस्थेत स्थिर झाले ते तेथल्या- तेथेंच म्हणजे मरणाची वाट न पहाता मृत्युलोक जिंकितात, कारण ब्रह्म है निर्दोष व सम आहे, म्हणून ( साम्यबुद्धीचे) हे पुरुष (नेहमीच) ब्रह्माच्या ठायीं स्थित म्हणजे येथल्यायेथेच ब्रह्मभूत झालेले असतात. । [आत्मास्वरूपी परमेश्वर अकर्ता व सर्व खेळ प्रकृतीचा हे ज्याने ओळ- खिलें तो 'ब्रह्मसंस्थ ' छाला व स्यालाच मोक्ष मिळतो- ब्रह्मसंस्थो मृतत्वमेति' (छौ २.२३.१)-असें उपनिषदांतून जें वर्णन आहे, स्थाचाच हा अनुवाद आहे. तथापि या अवस्थेत हि कम सुटत नाहीत असा गीतेचा अभिप्राय आहे हे वरील श्लोक १ ते १२ वरून उघड होते छांदोग्योपनिषदांतील वाक्याचा शंकराचार्यांनी संन्यासपर अर्थ लाविला आहे. पण मूळ उपनिषदातील पूर्वापर संदर्भ पाहिला तर ब्रह्मसंस्थ' झाल्यावरहि तीन आश्रमांची कमैं करणारात उद्देशूनच हे वाक्य असण्याचा अधिक संभव आहे असें दिसुन येईल; वहाच अर्थ या उपनिषदाच्या शेवटी स्पष्ट निरूपिला आहे (छां. ८.१५.१ पहा). ब्रह्मज्ञान झाल्यावर ही अवस्था जिवंतपणीच प्राप्त होत असल्यामुळे यालाच जीवान्मुक्तावस्था असे म्हणतात (गीतार, प्र. १. पृ. २९५ पहा). हीच अध्यात्मविद्येची पराकाष्ठा होय छ चित्तवृत्तिनिरोधरूपी ज्या योगसाधनांनी ही अवस्था प्राप्त होऊ शकते ती पुढील अध्यायांत सविस्तर सांगितली आहेत. या अध्यायांत आतां फक या अवस्थेचें जास्त वर्णन केले आहे.) - - - - -- - - - - - - - - - - - - - - - - - - --