पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ५, १२९ $ याऽतःसुखोऽतरारामस्तांतज्योतिरेव यः। स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।। २४ ॥ लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृपयः क्षीणकल्मषाः। छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥२५॥ कामक्रोधचियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६ ॥ स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांचटुंश्चैवांतरे भ्रुवोः। प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ ॥ २७॥ विशेषण दिले आहे, तर येथे २२ व्या श्लोकांत आधन्तवन्तः' असे म्हटले असून ' मात्रा' शब्दाऐवजी बाह्य' शब्द आला आहे; 'युक्त' कोणास म्हणावें याची व्याख्याहि यांतच आली आहे. सुखदुःखांचा त्याग न करितां समबुद्धीने ती सोसणे हेच युक्तपणाचे खरे लक्षण होय. गीता २. ६५ वरील टीका पहा.] (२४) याप्रमाणे (बाह्य सुखदुःखांची अपेक्षा न ठेवितां) जो अंतःसुखी म्हणते अंतःकरणांत सुखी झाला, जो अंतर्रातच आराम पावं लागला, आणि तसेच ज्याला (हा) अंतःप्रकाश मिळाला, तो (कर्म-) योगी ब्रह्मरूप होऊन त्यालाच ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मांत मिळून आण्याचा मोक्ष प्राप्त होतो. (२५) ज्या ऋषींची द्वंद्वबुद्धि सुटली म्हणजे सर्व ठिकाणी एकच परमेश्वर आहे हे तत्व ज्यांनी जाणिलें, ज्यांची पापे नाहीशी झाली, आणि जे आत्मसंयमनामें सर्व भूतांचे हित करण्यांत रत झाले त्यांना हा ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष मिळत असतो. (२६) कामक्रोधविरहित, आत्मसंयमी व आत्मज्ञानसंपन्न असे जे यति स्यांना अभितः महणजे सभीवार अगर समोर ठेविल्याप्रमाणे (अर्थात बसल्या ठिकाणच) अनिर्वाणरूप मोक्ष मिळते' (२७) बाह्य पदार्थाशी (इंद्रियांचे सुखदुःखद) संयोग बाहेरच्या बाहेर ठेवून, ष्टि दोन भुवयांच्या मध्ये राखून आणि नाकांतून वहाणारे प्राण गी. .