पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ श्रीमद्भगवद्गीता. श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्परः संयतद्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥ अशश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥४०॥ $$ योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् । आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ॥४१॥ [३७ व्या श्लोकांत 'क' याचा अर्थ 'कर्माचे बंधन' असा आहे (गी. ४.१९ पहा). स्वतःच्या बुद्धीने आरंभिलेल्या निष्काम कर्मानी ज्ञानप्राप्ति करून घेणे हा ज्ञानप्राप्तीचा मुख्य किंवा बुद्धिगम्य मार्ग होय. पण ज्याला स्वतः आपल्या बुद्धीने याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही त्याच्याकरितां श्रद्धेचा दुसरा मार्ग आतां सांगतात--] (३९) हे ज्ञान जो श्रद्धावान् पुरुष इंद्रियसंयमन करून त्याच्याच पाठीस लागला त्याला (-हि) मिळते; आणि ज्ञान प्राप्त झाले झणजे लागलीच स्याला परम शान्ति प्राप्त होत्ये. [सारांश, बुद्धीने जे ज्ञान व शान्ति प्राप्त होणार तीच श्रद्धेनेंहि मिळस्ये (गी. १३. २५ पहा). परंतु ज्याला स्वतः बुद्धि नाही आणि श्रद्धाहि नाहीं तो- (५०) पण ज्याला स्वतः ज्ञान नाही आणि श्रद्धाहि नाही असा संशयखोर मनुष्य नाश पावतो. संशयखोराला हा लोक नाही, परलोक नाही आणि सुखहि नाही. [ज्ञानप्राप्तीचे स्वतःची पुद्धि शाणि श्रद्धा हे दोन मार्ग सांगितले. आतां ज्ञान व कर्मयोग यांचे पृथक् उपयोग दाखवून सर्व विषयांचा उपसंहार कारतात- (११) हे धनंजया ! (कर्म-) योगाच्या आश्रयाने ज्याने कर्मे झणजे.