पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- -


- गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः। सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिन संतरिम्यसि ॥ ३६ ।। यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्करतेऽर्जुन । शानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ३७॥ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विंदति ॥३०॥ स्मैक्यज्ञान पुढे वर्णिले आहेः (गी. ६.२९), स्याचाच येथे उल्लेख केलेला आहे. आत्मा आणि भगवान् हे दोन्ही मूळांत एकरूप असल्यामुळे, आत्म्यांत सर्व भूतांचा समावेश होतो म्हणजे पुढे अर्थातच भगवंताच्या ठायींहि स्यांचा समावेश होऊन, आत्मा (आपण), इतर भूते व भग- वान् हा विविध भेद नाहीसा होतो. यासाठी भागवतपुराणांत भगव- भक्ताचे लक्षण देतांना "सर्व भूते भगवंतांत व आपणांत जो पहातो तो उत्तम भागवत हाणाका" असे सांगितले आहे. (भाग. ११.२.४५). या महत्वाच्या गीतातावाचा जास्त खुलासा गीतारहस्याच्या १२ व्या (पृ. ३८८-३९६) व भक्तिदृष्टया १३ व्या (पृ. ४२८) प्रकरणात केला आहे तो पहा. (३६) सर्व पापी लोकांपेक्षा जरी अधिक पाप करणारा असलास तरी (या) ज्ञाननौकेनेच सर्व पाप तं तरून जाशील. (३५) ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नि (सर्व) काष्टे भस्म करून टाकितो त्याप्रमाणे हे अर्जुना ! (हा) ज्ञानरूप अग्नि सर्व कर्माचे (शुभाशुभ बंधन) भस्म करून टाकितो. [ज्ञानाची महती काय ती सांगितली. आता हे ज्ञान कोणत्या उपायांनी संपादन होते ते सांगतात-] (३८) ज्ञानासारखे पवित्र या लोकी खरोखरच दुसरे काही नाही. ते झान कालाने ज्यास योग झणजे कर्मयोग सिद्ध झाला तो स्वताच आपल्या ठायीं प्राप्त करून घेतो.