पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. ११७ तस्मादशानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ! छित्वैनं संशयं योगमात्तिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्ने श्रीकृष्णार्जुन- संवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ३॥ कर्मबंधने टाकिली, आणि ज्ञानामुळे ज्याचे संशय खिन्न झाले, अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बाधू शकत नाहीत. (४२) तस्मात् आपल्या हृदयांत अज्ञानाने उत्पन्न झालेला हा संशय ज्ञानरूप तरवारीने छाटून टाकन. (कर्म-) योगाचा आश्रय कर. (आणि) हे भारता! (युद्धाला) उभा रहा! । [ईशावास्योपनिषदांत 'विद्या' आणि 'अविद्या' यांचे प्रथा उप- योग दाखवून ज्याप्रमाणे दोन्ही न सोडितां आचरण करण्यास सांगितले आहे (ईश, ११; गीतार. प्र. ११ पृ. ३.७ पहा), त्याचप्रमाणे गीतेच्या या दोन श्लोकांत ज्ञान आणि (कर्मः) यांचे पृथक उपयोग दाखवून त्यांच्या म्ह. ज्ञान व योग यांच्या समुच्चयाने कर्मे करण्याबद्दल अर्जुनास उपदेश आहे. निष्काम बुद्धियोगार्ने कर्मे केली म्हणजे कर्माची बंधने तुटून जाऊन ती मोक्षाला प्रतिबंधक होत नाहीत, आणि ज्ञानार्ने मनांतले संशय फिटून मोक्ष मिळतो, असा या दोहोंचा पृथक् पृथक भपयोग आहे. म्हणून एकटें कर्म अगर एकटें ज्ञान न स्वीकारितां ज्ञान- कर्मसमुच्चायात्मक आश्रय करून युद्ध कर, असा अखेर उपदेश आहे. योगाचा आश्रय करून युद्धाला उभे रहावयाचे असल्यामुळे योग शब्दाचा 'कर्मयोग' असाच येथें अर्थ घेगें जरूर पडते, हे गीतारहस्य प्र.३ पृ. ५९ मध्ये दाखविले आहे. ज्ञान आणि योग यांचा हा मिला- फच " ज्ञानयोग व्यवस्थितिः" या पदाने पुढे (गी. १६.१) देवी संपत्तीच्या लक्षणांत पुनः सांगितला आहे.]