पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ श्रीमद्भगवद्गीता. ६ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं शानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४ ॥ यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव । येनभूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ।। ३५ ।। खेरीज होत नाही. म्हणून परमेश्वरस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचरणाने परमेश्वराची प्राप्ति करून घेणे या मार्गास किंवा साधनास 'ज्ञानयज्ञ' असे म्हणतात. हा यज्ञ मानस व बुद्धिसाध्य असून द्रव्यमय यज्ञापेक्षां याची योग्यता अर्थात् अधिक समजतात. ज्ञानयज्ञांतील ज्ञानच मोक्षशास्त्रांत मुख्य असून या ज्ञानानेच सर्व कर्माचा क्षय होतो, काही झाले तरी शेवटी परमेश्वराचे ज्ञान झाले पाहिजे. ज्ञानाखेरीज मोक्ष नाही, हा गतिचा कायम सिद्धान्त आहे. तथापि "कर्माचे पर्यवसान ज्ञानांत होते" या बचनाचा ज्ञानोत्तर कमैं सोडून धावयाची असा अर्थ नाही हे गीतारहस्याच्या १० व्या व १३ व्या प्रक- रणांत सविस्तर प्रतिपादन केले आहे. स्वतःसाठी नको तरी लोकसंग्र- हार्थ कर्तव्य म्हणून सर्व कर्मे केलीच पाहिजेत; आणि ती ज्या अर्थी ज्ञानाने व समबुद्धीने केलेली असतात त्या अर्थी त्यांच्या पापपुण्याची बाधा कांस न लागतां (पुढे श्लोक ३७ पहा) हा ज्ञानयज्ञ मोक्षप्रद होतो. म्हणून यज्ञ करा, पण ते ज्ञानपूर्वक निष्काम बुद्धीने करा, असा गीतेचा सर्वोस उपदेश आहे. ] (३४) ध्यानांत ठेव की, ते ज्ञान प्रणिपातानें, प्रश्नाने आणि सेवेनें सत्त्ववेत्ते ज्ञानी पुरुष तुला उपदेशितील; (३५) जे ज्ञान प्राप्त झाल्यावर हे पांडवा ! पुनः तुला या प्रकारे मोह होणार नाही, आणि ज्या ज्ञानाच्या योगाने यच्यावत् सर्व भूतें तुझ्या स्वतःचे ठायीं, आणि मग माझ्या ठायीं, आहेत असे तुला दिसून येईल. 1 [सर्व भूते आपल्यात आणि आपण सर्व भूतांत असें जें सर्वभूता-