पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. १३ कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥३२॥ श्रेयान्द्रव्यमयाद्यशाज्ञानयज्ञः परंतए । सर्व कर्माखिलं पार्थ शाने परिसमाप्यते ॥ ३३ ॥ पाया ठरल्यावर केवळ कर्तव्य म्हणून हे 'यज्ञ' करण्यास प्रत्येक मनुष्य शिकल्याखेरीज समाजव्यवस्था नौट रहावयाची नाही, हे सांगावयास नको.] (३२) याप्रमाणे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्माचे (च) मुखांत चालू आहेत ते सर्व कर्मापासून निष्पन्न होतात असें जाण. हे ज्ञान झाले म्हणजे तूं मुक्त होशील. । [ज्योतिष्टोमादि द्रव्यमय श्रौतयज्ञ अग्नीत हवन करून करितात; व अग्नि है देवांचे मुख अपल्यामुळे हे यज्ञ त्या त्या देवतांस पाँचतात असे शास्त्रांत सांगितले आहे. पण देवांचे मुख जो अग्नि त्यांत वर सांगितलेले लाक्षणिक यज्ञ होत नसल्यामुळे, या लाक्षणिक यज्ञांनी श्रेयाप्राप्ति कशी होणार, अशी कदाचित् कोणी शंका धेईल, तर ती दूर करण्यासाठी हे यज्ञ साक्षात् ब्रह्माच्याच मुखांत होतात असे आतां म्हटले आहे. यज्ञविधींचे हे व्यापक स्वरूप केवळ मीमांसकांचा संकु- चित अर्थच नव्हे-ज्या पुरुषाने जाणिले स्याची बुद्धि कोती न रहातां ब्रह्मस्वरूप ओळखण्यास तो अधिकारी होतो, असा दुसन्या चरणाचा भावार्थ आहे. आता या सर्व प्रकारच्या यज्ञात श्रेष्ठ कोणता ते सांगतात- (१३) हे परंतपा! द्रव्यमय यज्ञापेक्षां ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ. कारण हे पार्था ! सर्व प्रकारच्या सर्व कर्माचे पर्यवसान ज्ञानांत होत असते. [ज्ञानयज्ञ' हा शब्द गीतेत पुढेहि दोनदा आलेला आहे (गी.९. १५ व १८.७०), आपण द्रव्यमय यज्ञ करितो तो परमेश्वरमापयर्थ करीत असतो. पण परमेश्वराची प्राक्षि त्याच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्या.