पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । सह भोजन करावे; आणि याप्रमाणे वर्तन केले म्हणजे गृहस्था- श्रम सफल होऊन सद्गतिप्रद होतो. “विध मुक्तशेषू तु यज्ञशेषमथामृतम्" (मनु. २.२८५)-अतिथि वगरे जेवून उरेल ते 'विघस' व यज्ञ करून शेष राहील ते 'अमृत'-- अशा व्याख्या देऊन प्रत्येक गृहस्थाने नित्य विघसाशी व अमृताशी असावे असें मनुस्मृतींत व इतर स्मृतीतहि म्हटले आहे (गी. ३.१३ व गीतारहस्य पृ. २८८ पहा), भगवान आतां असे सांगतात की, हा लो सामान्य गृहयज्ञास लागू होणारा सिद्धान्त तोच वरील सर्व प्रकारच्या यज्ञास लागू पढतो. यज्ञार्थ केलेले कोणतेहि कर्म बंधक होत नाही इतकेच नव्हे, तर त्या कमपिकी अवशिष्ट कम आपल्या स्वतःच्या उपयोगाला लागली तरीहि ती बंधक होत नाहींत (गीतार. प्र. १२ पृ. ३८३ पहा). " यज्ञाखेरीज इहलोकहि सिद्ध होत नाही ' हे शेवटचे बाक्य मार्मिक असून महत्त्वाचे आहे. यज्ञाखेरीज पाऊस पडत नाही व पाऊस न पडला म्हणजे इहलोकींची यात्रा चालत नाही एवढाच त्याचा अर्थ नाही. तर 'यज्ञ' शब्दाचा व्यापक अर्थ घेऊन, आपल्याला प्रिय झालेल्या काही गोष्टी प्रत्येकाने सोडून दिल्याखेरीज सर्वांना सारखीच सवलत मिळून जगाचे व्यवहार चालणे शक्य नाही, या सामाजिक तवाचाहि त्यांत पर्यायाने समावेश झालेला आहे. उदाहरणार्थ, प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याला आळा घातल्याखेरीज इतरांस सारखेच स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही, असा पाश्चिमात्य समाजशास्त्रकार जो सि- दान्त सांगतात तोच या तश्वाचे एक उदाहरण आहे; आणि गीतेच्या परिभाषेनेच हाच अर्थ सांगावयाचा असल्यास "प्रत्येकाने आपल्या स्यातंत्र्याचा अंशतः तरी यज्ञ केल्याखेरीज इहलोकीचें व्यवहार चाला- वयाचे नाहीत, " अशी यज्ञपर भाषाच या ठिकाणी योजावी लागेल अशा प्रकारच्या व्यापक व विस्तृत अर्थाने यज्ञ हाच सर्व समाजरचनेचा