पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् । नायं लोकोऽस्त्ययशस्य कृतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१ ॥ अर्थ अभिप्रेत असतात; उदाहरणार्थ, महाभारत, वनपर्व, अध्याय २१२ यांत प्राणादि वायूंची निराळीच लक्षणे दिली असून त्यांत प्राण झणजे डोक्यांतला व अपान ह्मणजे वाली सरकणारा वायु असे सटले आहे (प्रश्न ३.५ व मैन्यु. २.६ पहा). यापैकी ज्या वायूचा निरोध करितात स्याचा इतर वायूंन होम होतो, असा वरील श्लोकांतील वर्णनाचा अर्थ आहे. (३०) दुसरे कित्येक आहार नियमित करून प्राणांचाच प्राणाच्या ठायीं होम करितात हे सर्वच यज्ञा क्षीणपाप झालेले, यज्ञवेत, (३१) (आणि ) अमृत यज्ञवेत्ते, (३१) (आणि ) अमृत म्हणजे यज्ञ करून जे शेष रहाते, त्याचा उपभोग घेणारे अमन सनातन ब्रह्माप्रत पोचतात. यज्ञ न करणा- रास इहलोक (सिद्ध होत ) नाहीं; मग हे कुरुश्रेष्ठा ! परलोक कोठून (मिळणार )? । [सारांश, यज्ञ करणे जरी वेदाज्ञेप्रमाणे मनुष्याचे कर्तव्य आहे तरी हा यज्ञ एक प्रकारचा असतो असे नाही. प्राणायाम करा, तप करा, वेदाध्ययन करा, अग्निष्टोम करा, पशुयज्ञ करा, तीळतांदूळ किंवा तूप वांचे हवन करा, वेदाध्ययन करा, पूजा करा किंवा नैवेद्यवैश्वदेवादि पांच गृहयज्ञ करा, फलासक्ति सुटलेली असली म्हणजे हे सर्व व्यापक अर्थाने यज्ञच होतात आणि मग यज्ञशेषभक्षणासंबंधाने मीमांसकांचे जे सिद्धान्त आहेत. ते सर्व यापैकी प्रत्येक यज्ञास लागू पडतात. पैकी पहिला नियम म्हटला म्हणजे " यज्ञार्थ केलेले कर्म बंधक होत नाही" हा होय, व तो पूर्वी २३ व्या श्लोकांत सांगितला (गी. ३.९ वरील टीका पहा). आता दुसरा नियम असा आहे की, प्रत्येक गृहस्थाने पंचमहायज्ञ करून अतिथि वगेरे जेवल्यावर मग आपल्या पस्नी-