पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥२९ ॥ अपरे नियताहाराः प्राप्पान्प्राणेषु जुह्वति । सर्वेऽप्येते यक्षविदो यशक्षपितकल्मषाः ॥ ३०॥ पातंजल योगाप्रमाणे प्राणायाम करणे हा तरी एक यज्ञच होय असें या श्लोकांचे तात्पर्य आहे. हा पातंजलयोगरूप यज्ञ २९ व्या श्लोकांत सांगितला असल्यामुळे " योगरूप यज्ञ" या २८ व्या श्लोकां. तील पदाचा अर्थ कर्मयोगरूपी यज्ञ असा केला पाहिजे. प्राणायाम शब्दांत प्राण या शब्दाने श्वास व उरलास या दोन्ही क्रिया दाख- विल्या जातात; पण प्राण आणि अपान असा जेव्हां भेद करितात, तेव्हां प्राण म्हणजे पुढे जाणारा म्हणजे उच्छास वायु आणि अपान म्हणजे आंत येणारा श्वास, अप्ला अर्थ घेत असतात (वे.सू.शां. भा. १२.४.१२; व छांदोग्य. शां. भा. १.३.३. पहा). प्राण व अपान यांचे अर्थ नेहमीच्या प्रचारांतील अर्थीहून भिन्न आहेत हे येथे लक्षांत ठविले पाहिजे. या अर्थी अपानांत आंत ओढून घेतलेल्या श्वासांत प्राणाचा म्हणजे उच्छासाचा होम केला म्हणजे पूरक नांवाचा प्राणायाम होतो; आणि उलटपक्षी प्राणांत अपानाचा होम केला ह्मणजे प्राणायाम चक प्रणावयाचा. प्राण व अपान या दोहोंचाहि निरोध झाला ह्मणजे तोच प्राणायाम कुंभक होय, आतां याखेरीज व्यान, उदान व समान असे तीन वायु शिल्लक राहिले. पैकी व्यान हा प्राण व अपान यांच्या संधिस्थानी राहून, धनुष्य अढणे, ओझे उचलणे इत्यादी दम छाटून किंवा अर्धवट श्वास आंवरून जोराची कमें जेव्हा करावी लाग. तात तेव्हा व्यक्त होतो (छो१.३६.) उदान ह्मण जे मरणपमयीं निघून जाणारा (प्रश्न ३.५), व समान ह्मणजे अन्नरस शरीरात सर्व ठिकाणी एकसारखा पोचविणारा वायु (प्रश्न ३.५) असे या वायूंधे वेदान्त- शास्त्रांतले सामान्य अर्थ होत. परंतु काही ठिकाणी यापेक्षा निराळे