पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. १०१ द्रव्ययशास्तपोयशा योगयशास्तथापरे । स्वाध्यायशानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८ ॥ अपाने जुह्वति प्राणं प्राणेपानं तथापरे ।

अपूर्व सांगितलेली आहे असे नाही. मनुस्मृतीच्या ४थ्या अध्यायांत गृहस्था

श्रमाचे वर्णन चालू असतां प्रथम ऋपियज्ञ, देवयज्ञ, भूत यज्ञ, मनुष्य यज्ञ व पितृयज्ञ, हे स्मार्त पंचमहायज्ञ प्रत्येक गृहस्थाने सोडूं नयेत असे सांगितल्यावर, याऐवजी कित्येक इंद्रियांत वाचेचे, किंवा वाचत प्राणाचे हवन करून अगर अखेर ज्ञानयज्ञानेंहि परमेश्व- (राचे यजन करितात," असे म्हटले आहे (मनु. २१-२४ पहा.). इतिहासदृष्टया पाहिले तर इंद्र, वरूण, वगैरे देवतोद्देशाने जे द्रव्यमय यज्ञ श्रौत ग्रंथांत सांगितले आहेत ते मागे पडत जाऊन पातंजल योगानें, संन्यासाने किंवा आध्यात्मिक ज्ञानाने परमेश्वरप्राप्ति करून घेण्याचे मार्ग जेव्हा अधिकाधिक प्रचारांत येऊ लागले, तेव्हां 'यज्ञ' शब्दाचा अर्थ विस्तृत करून त्यांतच सर्व मोक्षोपायांचा लक्षणेने समावेश करण्यास सुरुवात झाली असावी असे दिसून येते. पूर्वी धर्म- दृष्टया रूढ झालेले शब्दच पुढील धर्ममार्गास लावावयाचे हे यांतील बीज होय, कसेंहि असो; गीतेच्या पूर्वी किंवा निदान तत्काली तरी ही कल्पना सर्वमान्य झालेली होती एवढे मनुस्मृतीतील विवेचनावरून स्पष्ट होते. (२८) याप्रमणे तीक्ष्ण व्रताचरण करणारे यत्ति म्हणजे संयमनशील पुरुष कोणी द्रष्यरूप, कोणी तपोरूप, कोणी योगरूप, स्वाध्याय म्हणजे नित्य स्वकर्मानुष्ठानरूप आणि कोणी ज्ञानरूप यज्ञ करीत असतात, (२९) प्राणायामाचे ठायीं तत्पर होस्साते प्राण व अपान यांच्या गतीचा निरोध करून, कित्येक प्राणवायूचा अपानांत, तर दुसरे अपानवायूचा प्राणांत होम करितात.