पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः । कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति सः ॥ २० ॥ निराशर्यतचित्तात्मा त्यक्त सर्वपरिग्रहः। शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ २१ ।। ' होते (गीतारहस्य प्र.१०. पृ. २८२-२८६ पहा), तसेंच पुढे 'सारंभ- परित्यागी'-सर्व आरंभ किंवा उद्योग सोडणारा-असें में भगवद्भकाचे वर्णन आलें आहे (गी. १२.१६॥४.२५ ) त्याचाहि अर्थ काय याचा याने निर्णय होतो. आता हाच अर्थ अधिक व्यक्त करितात--] (२०) कर्मफलाची आसक्ति सोडून सदा तृप्त व निराश्रय म्हणजे अमक्यातमक्यासाठी अमुक करितों अशी कर्मफलाच्या साधनाला आश्र- यीभूत झालेली बुद्धि न ठेवणारा (पुरुष), कमैं करण्यांत गढलेला असला तरी तो काहीच करीत नाही ( असे म्हणावयाचें). (२१) आशी: ह्मणजे फल वासना सोडणारा, चित्ताचे नियमन करणारा, व सर्व संगमुक्त झालेला पुरुष केवळ शारीर म्हणजे शरीराने किंवा कमद्रियांनीच कर्म करीत असता त्याला पाप लागत नाही. [विसाव्या श्लोकांतील निराश्रय शब्दाचा अर्थ घरदार न करणारा (संन्यासी) अंसा कित्येक करीत असतात; पण तो बरोबर नाही. आश्रय म्हणजे वर किंवा बिन्हाड म्हणता येईल; पण प्रकृत स्थली कोचे स्वतः रहावयाचें बिन्हाड विवक्षित नसून तो जे कर्म करितो स्याचे हेतुरूप बिहार कोठे दिसूं नये असा अर्थ आहे; व तोच अर्थ गीता . . या श्लोकांत 'अनाश्रितः कर्मफलं' या शब्दांनी स्पष्ट व्यक्त केलेला असन, वामन पंडितांनी आपल्या गीतेवरील यथार्थदीपिका नांधाच्या मराठी टीकेत स्वीकारला आहे. तसेंच २१ ग्या श्लोकांत 'शारीर' म्हणजे शरीरपोषणापुरते भिक्षाटनादिक कर्म असाहि अर्थ नाही. “योगी म्हणजे कर्मयोगी आसक्ति किंवा काम्य बुद्धि मनांत न