पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. यस्य सर्वे समारंभा: कामसंकल्पवर्जिताः । झानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥ १९ ॥ तरी ते विकर्मच, अकर्म नव्हे (गी. १८.७). रहासां रहातां राजस कम शिल्लक राहिली. ही कम पहिल्या प्रतीची म्हणजे सात्विक नव्हेत किंवा गीता ज्याला खरोखरी ' अम' म्हणस्ये तेही नव्हे. गीता याला “राजस' कर्म म्हणत्ये; पण कोणास पाहिजे असल्यास अशा राजस कर्माना 'कर्म' हा एकेरी शब्द लावण्यास काही हरकत नाही. तात्पर्य, कर्म की अर्म हे सदर कर्माच्या बंधकस्वाधरून ठरवावयाचे आहे; क्रियात्मक स्वरूपावरून नव्हे, किंवा कोरड्या धर्मशास्त्रावरूनहि नव्हे. अष्टावक्रगीता सन्यामार्गीय आहे; तथापि तीतहि-- निवृत्तिरपि मूढस प्रवृत्तिरुपजायते । प्रवृत्तिरपि धीरस्य निवृत्तिफलभागिनी ।। म्हणजे मूर्ख लोकांची जी निवृत्ति अथवा हद्दवाने किंवा मोहाने का. पासून पराङ्मुखता तीच वस्तुतः प्रवृत्ति म्हणजे कमै होते; आणि शहाण्या लोकांची जी प्रवृत्ति म्हणजे निष्काम कर्म त्यानेच निवृत्ति, म्हणजे कर्मत्यागाचे फल मिळते असे म्हटले आहे. (अटा. १८.६१) गीतेतील वरील श्लोकांत हाच अर्थ विरोधाभासरूपी अलंकाररीत्या मजेनें वर्णिला असून, अकर्माचे हे गीतेतले लक्षण नीट लक्षात ठेवि. ल्याखेरीज गीतेतील कर्माकर्मविवेचनाचें मम कधीहि लक्षांत याव- याचें नाहीं. हाच अर्थ आतां पुढील श्लोकांतून अधिक व्यक्त करून सांगतात--] (१९) ज्यांचे सर्व समारंभ म्हणजे उद्योग फलेच्छाविरहित असतात, यालाच ज्ञानाप्नीने कम दग्ध झालेला पंडित, असें ज्ञाते पुरुष रणत असतात. । ज्ञानाने कर्मे भस्म होतात याचा अर्थ कमैं सोडणे असा नसून फलेच्छा सोडन कम करणे असा समजावयाचा हे यावरून उघड