पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. यदृच्छालाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः। समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबद्धयते ॥ २२ ॥ गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः। यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३ ॥ ठेवितां केवळ इंद्रियांनी कर्मे करीत असतात" असे जे पुढे ६ व्या अध्यायांत (५.११) वर्णन आहे त्याशी समानार्थकच "केवलं शारीरं कर्म" या पदांचा खरा अर्थ आहे. इंद्रियें कमें करितात खरी, पण बुद्धि सम असल्याने त्या कर्माचे पाप अगर पुण्य कयास लागत नाही.] (२२) यहच्छेने जे प्राप्त होईल त्यांत संतुष्ट, (हर्षशोकादि) द्वंद्वांपासून मुक्त, निमत्सर, आणि (कर्माची) सिद्धि होवो वा न होवो सारखेच मान- णारा, पुरुष (कम) करूनहि ( त्यांच्या पापपुण्याने) बांधला जात नाही. (२३) आसंगरहित, (रागद्वेशंपासून) मुक्त, (साम्यबुद्धिरूप) ज्ञानाचे ठिकाणी स्थिरचित्त झालेला आणि (केवळ) यज्ञासाठी म्हणून (जो) कर- णारा त्या पुरुषाचे कर्म समग्र लयास जाते ! [मागे तिसच्या अध्यायांत (३.५) यज्ञार्थ केलेले कर्म मीमांसकमतें बंधक होत नाही, व तेच आसक्ति सोडून केले म्हणजे स्वर्गप्रद न होतां मोक्षप्रद होते, असा जो अर्थ वर्णिला आहे तोच या श्लोकांत सांगितला आहे. “ समग्र लयाला जाते" यांत 'समन' पद मह- स्वाचे आहे. मीमांसक स्वर्गसुख हेच परमसाध्य मानितात, व त्यांच्या दृष्टीने स्वर्गसुख प्राप्त करून देणारे कर्म बंध होत नाही. पण गीतेची दृष्टि स्वर्गापलीकरे म्हणजे मोक्षावर आहे; व या दृष्टीने स्वर्गप्रद कर्मेहि बंधकच होत म्हणून यज्ञार्थ कर्महि अनासक्त बुद्धीने केल्यास 'ससन' लय पावते म्ह० स्वर्गप्रदहि न होतां मोक्षप्रद होते असे म्हटले आहे. तथापि या अध्यायांतील यज्ञप्रकरणाच्या प्रतिपादनात एक मोठाच भेद आहे. तिसच्या अध्यायांत श्रौतस्मात अनादि यशचक्र " - - - - - - - - - - - - - - --... - - -