पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क- श्रीमद्भगवद्गीता. 56 जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९॥ वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । वहबो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥ (९) माझे या प्रकारे दिव्य जन्म व दिव्य कर्म यांतील तत्व जो जाणितो, तो देहत्यागानंतर पुन: जन्मास न येतां, हे अर्जुना ! मला येऊन मिळतो. (१०) प्रीति, भय व क्रोध सुटलेले, मस्परायण झालेले व माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक (याप्रमाणे) ज्ञानरूप तपाने शुद्ध होत्साते मत्स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत. भगवंताचे दिव्य जन्म समजण्यास अव्यक्त परमेश्वर मायेने सगुण कसा होतो हे कळावे लागते, व हे कळले म्हणजे अध्यात्मज्ञान होते; आणि दिव्य कर्म कळले म्हणजे कर्म करूनहि अलिप्त रहाण्याचे ह्मण ने निष्काम कर्माच्या तत्त्वाचे ज्ञान होते. सारांश, परमेश्वराचं दिव्य जन्म व दिव्य कर्म पुरै कळले म्हणजे अध्यात्मज्ञान आणि कर्मयोग या दोहोंचीहि पूर्ण ओळख होत्ये; व मोक्षप्राप्ती होण्यास हेच लागत अस. ल्यामुळे अशा मनुष्यास अखेर भगवत्प्राप्ती झाल्याखेरीज रहात नाही. अर्थात्, भगवंताचं दिव्य जन्म व दिव्य कर्म कळले म्हणजे त्यांत सर्व काही आले; अध्यात्मज्ञान किंवा निष्काम कर्मयोग या दोहोंचेहि निराळे अध्ययन करावयास नको. म्हणून भगवंताच्या जन्माचा व कृत्याचा विचार करा, म त्यांतील तत्त्व ओळखून वागा म्हणजे भगवत्प्राप्ति होण्यास दुसरे काही साधन नको, असे सांगणे आहे. भगवंताची खरी उपासना हीच होय. आतां यापेक्षा खालच्या उपासनांचे फल व उपयोग सांगतात--


- - - - - - - - - - - - - - - -