पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥ बनतो म्हणजे कर्म कसे उत्पन्न झालेले दिसते ते सांगून, आतां तो असें केव्हा व कशासाठी करितो, याचा खुलासा करितात--] (७) हे भारता ! जेव्हा जेव्हां धर्माची ग्लानि होऊन अधर्माचे प्रा- बल्य माजते तेव्हां (तेव्हां) मी आपण स्वतःच जन्म (अवतार) घेत असतो. (८) साधूंच्या संरक्षणार्थ आणि दुष्टांचा नाश करण्यास युगी युगी धर्मसंस्थापनेसाठी मी जन्म घेत असतो. [या दोन्ही श्लोकांत 'धर्म' शब्दाचा अर्थ केवळ पारलौकिक वैदिक धर्म असा नाही. चातुर्वण्यांचे धर्म; न्याय, नीति, वगैरे गोष्टीचाच त्यांत मुख्यत्वेकरून समावेश होतो. जगांत अन्याय, अनीति, दुष्टपणा व बेबंदशाही माजून साधूंच। छल व दुष्टांचे वर्चस्व झाले म्हणजे, आपण निर्माण केलेल्या जगाची सुस्थिति कायम राहून त्याचे कल्याण व्हावे म्हणून, तेजस्वी व पराक्रमी पुरुषाच्या रूपाने (गी. १०.४१) अव- तार घेऊन भगवान् समाजाची विस्खलित झालेली घडी पुनः नीट बस- वून देत असतात, असे या श्लोकाचे तात्पर्य आहे. अशा रीतीने अव- तार घेऊन भगवान् काम करितात त्याचेच 'लोकसंग्रह' हे दुसरे नांव आहे; व हेच काम आत्मज्ञानी पुरुषांनीहि यथाशक्ति व यथाधि. कार केले पाहिजे, असे पूर्वीच्या अध्यायांत सांगितले आहे (गी. ३. २०). परमेश्वर केव्हां व कशासाठी अवतार घेतो ते सांगितले. आतां हे तत्व ओळखून त्याप्रमाणे जे पुरुष वर्तन करितात त्यांस कोणती गति मिळत्ये ते सांगतात-