पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वत्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः॥११॥ कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः। क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥ (११ जे मला ज्या प्रकारें भजतात त्यांना मी त्याप्रमाणेच फल देतो. हे पार्था ! कोणीकडून झाले तरी मनुष्ये माझ्याच मार्गाला येऊन मिळत असतात. । [मम वर्मानुवर्तन्ते इ.' हे उत्तरार्ध पूर्वी (३.२३) थोड्या

निराकया अर्थाने आले आहे; व त्यावरूव गीतेत पूर्वापर संदर्भाप्रमाणे

'अर्थ कसा बदलतो हे लक्षात येईल. असो; कोणत्याहि वाटेने गेले तरी । परमेश्वराकडेच जातो हे जर खरे तर अनेक लोक अनेक मार्गानी को जातात याचे कारण सांगतात--] (१२)(कर्मबंधनाशाची नव्हे, तर केवळ) कर्मफलची इच्छा करणारे लोक (सदर) कर्मफल (या) मनुष्यलोकी लवकर प्राप्त होते, म्हणून इहलोकी देवतांची पूजा करीत असतात. । [हेच विचार पुढे सातव्या अध्यायांत पुनः आले आहेत (गी. ७. २१.२२ पहा). परमेश्वराराधनाचे खरें फल मोक्ष असून ते कालान्त- राने व दीर्घ आणि एकान्त उपासनेने जेव्हां कर्मबंधनाचा पूर्ण नाश होतो तेव्हांच प्राप्त होत असते; पण इतके दूरदर्शी व दीर्घोद्योगी लोक फारच थोडे असतात. बहुतेकांस आपल्या उद्योगाने म्हणजे कर्माने या लोकीच काहींना काही तरी मिळावयास पाहिजे असते,व असले लोक देवतांच्या नादी लागतात, असा या श्लोकाचा भावार्थ आहे (गीतार. प्र. १३५.४२. पहा ). पण तरी पर्यायाने परमेश्वराचेंच पूजन होते, वहा योग वाढत वाढत त्याचे पर्यवसान निष्काम भक्तीत होऊन अखेर मोक्ष प्राप्त होतो असेंहि पुढे गीतेचे सांगणे आहे (गी. ७.१९). धर्मसंस्थापना करण्यास परमेश्वर अवतार घेतो असें पूर्वी सांगितले