पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ श्रीमद्भगवद्गीता. श्रीभगवानुवाच । बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतम ॥ ५॥ अजोऽपि सनव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् । प्रकृति स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥६॥ श्रीभगवान म्हणाले-(4) हे अर्जुना ! माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. ते सर्व मी जाणितो; (आणि) हे परंतपा! तूं जाणीत नाहींस (हा भेद आहे). (६) मी (सर्व) भूतांचा धनी व जन्म- विरहित असून, माझे आत्मस्वरूप जरी कधीहि व्यय म्ह. विकार पावत नाही, तरी माझ्याच प्रकृतीच्या ठायीं अधिष्ठित होऊन, मी आपल्या मायेने जन्म घेत असतो. या श्लोकांतील अध्यात्मज्ञानांत कापिल सांख्य व वेदान्त या दोन मतांचीच जोड घातलेली आहे. प्रकृति आपण होऊनच सृष्टि निर्माण करित्य असे सांख्यांचे मत आहे, पण वेदान्ती प्रकृति में एक परमेश्वराचे स्वरूप समजून प्रकृतींत परमेश्वर अधिष्ठित झाला म्हणजे प्रकृतीपासन व्यक्त सृष्टि निर्माण होत्ये असें मानितात. सर्व जग आपल्या अध्यक्त स्वरूपापासून निर्माण करण्याची परमेश्वराची जी ही अचिंत्य शक्ति तिलाच 'माया' हे नांव गीतेत दिले आहे; व त्याप्रमाणे श्वेताश्वतरोप- निषदांतहि "मायां तु प्रकृति विद्यान्मायिनं तु महेश्वरम्" म्हणजे "प्र. कृति हीच माया आणि परमेश्वर हा त्या मायेचा मालक" (वे.४.१०), आणि अस्मान्मायी सृजते विश्वमेतत्'-यापासून मायेचा मालक सृष्टि उत्पन्न करितो (श्वे.४.९) असें वर्णन आहे. प्रकृतीला माया को झण- तात, या मायेचे स्वरूप काय, आणि मायेने सष्टि उत्पन्न होत्ये या म्हणण्याचा अर्थ काय, इत्यादि प्रश्नांचा जास्त खुलासा गतिारहस्याच्या ९ व्या प्रकरणांत केला आहे तो पहा, अव्यक्त परमेश्वर व्यक्त कसा