Jump to content

पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) आचार्यो ब्रूयात् नैवं सोम्य प्रतिपत्तुमर्हास, प्रतिषिद्धत्वा त् भेदमतिपत्तेः । अर्थ:-गुरु-बेटा, अशी समजूत घरून बसूं नको. असा भेद मानूं नको, अर्से ( शास्त्रांत ) सांगितले आहे. कथं प्रतिषिद्धा भेदमतिपत्तिरित्यत आह-' अन्योऽसाव- न्योऽहमस्मीति न स वेद ' ' ब्रह्म तं परादाद्योऽन्यत्रात्मनो ब्रह्म वेद ' 'मृत्योस्स मृत्युमामोति य इह नानेव पश्यति । इत्येवमाद्याः ॥ २६ ॥ , - अर्थ:-भेद धरूं नये असे कोठें सांगितले आहे ह्मणशील तर ह्या श्रुति पहा - तो निराळा, मी निराळा, असे ह्मणतो त्याला ज्ञान झाले नाही. आत्म्याहून ब्रह्म निराळें ह्मणेल त्याला ब्रह्म समजलेच नाहीं. ह्या दृष्टसृष्टीमध्ये ( ज्याला सर्व एकरूप दिसत नाहीं ) सर्व वेगवेगळे रूपानें जो पहातो तो एका मृत्यूनंतर दुसन्या मृत्यूकडे जातो ( जन्ममरणाच्या फेन्यांत पडतो ) अशी आणखी वचनें आहेत. एता एव श्रुतयः भेदमतिपत्तेः संसारगमनं दर्शयंति ॥ २७ ॥ अर्थ:- :- ह्या वर सांगितलेल्या श्रुतिवचनांतील तात्पर्य असे आहे की जो असला भेदाचा प्रकार मानील त्याला संसारांत पडावे लागेल. अभेदमतिपत्तेश्च मोक्षं दर्शयंति सहस्रशः । - - अर्थः -- त्यांचें ऐक्य जो मानील त्याला मोक्ष मिळेल असे सांगणारी श्रुतिवचनें हजारों आहेत. C स आत्मा तत्त्वमसि' इति परमात्मभावं विधाय आचार्यवान् पुरुषो वेद' इत्युक्त्वा 'तस्य तावदेव चिरं ' इति मोक्षं दर्शयंति अभेदविज्ञानादेव । अर्थः -- तो आत्मा तो तूंच आहेस. यांत आत्मा आणि पर - २