( १८ ) मात्मा ह्यांचे ऐक्य सांगून, गुरूला शरण जाईल त्याला ज्ञान होई. ल, असे बोलून, त्याला मग ते शाश्वत मिळेल; ह्या वचनावरून ऐक्यज्ञान होईल तरच मोक्ष मिळेल असें होतें. • सत्याभिसन्धस्यातस्करस्येव दाहाद्यभाववत् संसाराभाव दर्शयंति दृष्टांतेन । भेददर्शनादसत्याभिसन्धस्य संसारगम- नं दर्शयति तस्करस्येव दाहादिदृष्टांतेन ॥ २८ ॥ - अर्थः - खरें बोलणारा आणि चोरी न करणारा जसा विस्त बाने भाजत नाहीं, त्याप्रमाणे ह्या दृष्टांतावरून त्या ( ऐक्यबोध झालेल्या पुरुषा ) ला संसार लागत नाही असे श्रुतिवाक्ये सांगता. त. त्याप्रमाणेच खोटें भाषण करणाऱ्या चोराला जसा दाह होतो तर्फे भेद पहाणाराच्या गळ्यांत संसार पडतो, असे श्रुति सांगतात. 'त इह व्याघो वा' इत्यादिना च अभेददर्शनात् ' सस्व- राभवति इत्युक्त्वा तद्द्वीपरीतेन भेददर्शनेन संसारगमनं दर्शयंति । - अर्थ:- तोच ह्यावेळी [ स्वप्नांत ] बाघ हाऊन भीति दाखवि तो बगैरेवरून ऐक्य दिसतें, तोच स्वराट् होतो. त्याच्या उलट समजूत करून घेऊन जो आपल्याला भिन्न मानतो त्याला संसारांत पड़ावे लागते. अथ येऽन्यथाऽतो विदुरन्यराजानस्ते क्षय्यलोका भवन्ति इति प्रतिशाखम् । अर्थ:-- जे कोणी त्यांच्याहून त्याला भिन्न मानतात, ते आपल्या निराळ्या समजुतीमुळे नाश पावणान्या लोकांप्रत जातात. त्याप्रमाणे पुष्कळ श्रुति आहेत.
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/३२
Appearance