( १६ ) - स्मृतयोऽपि - आत्मैव देवताः सर्वाः, नवद्वारे पुरे देही, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि, समः सर्वेषुभूतेषु, उपद्रष्टाऽनुमंताच, उत्तमः पुरुषस्त्वन्यः, अशरीरं शरीरेषु, इसाद्याः | तशीच स्मृतिवचनेंही आहेत-आत्मा हाच सान्या देवता. नऊदारें असलेल्या नगरांत रहाणारा. देह धारण करणारा. मीच क्षेत्रज्ञ असें जाण. मी सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सारखा आहे. उपदेश देणारा व संमति देणारा, उत्तम पुरुष निराळाच आहे. शरीराहून निराळा असून ह्या शरीरांत असतो. वगैरे वचनें आहेत. - तस्मात् जात्यन्वयसंस्कारवर्जितः त्वमिति सिद्धम् ॥ २४ ॥ अर्थ:- तेव्हां; जात, कुल व संस्कार [ तुला चिकटत नाहींत ] त्यांना सोडून तूं निराळा आहेस, हे सिद्ध झालें. स यदि ब्रूयात् - अन्य एवाहं अज्ञः सुखी दुःखी बद्धः सं- सारी, अन्योऽसौ महिलक्षणः असंसारी देवः तमहं बल्युपहा- रनमस्कारादिभिः वर्णाश्रम कर्मभिश्वाराध्य संसारसागरात् उतित्तीर्षुः अस्मि कथं अहं स एव इति ॥ २५ ॥ — अर्थ:-ते जर हागेल:- ( छे छे हें काय भलतेंच ) मी निरा ळाच आहे. मला सुख दुःख भोगावे लागतें, मी संसारांत बद्ध होऊन पडलों आहे. तो परमात्मा निराळा आहे, माझ्याहून तो
फार वेगळा, तो प्रकाश करणारा, त्याला संसाराचा संबंध नाहीं. त्यानें मजवर कृपा करावी ह्मणून मी त्याला बळी देईन, नैवेद्य दाखवीन, नमस्कार घालीन, मी ज्या जातींत उत्पन्न झालों, माझा जो आश्रम असेल खाप्रमाणे कमें मी करीन, आणि त्या मोमानें + + ह्या संसाररूपी समुद्रांतून तरून जाईन. तेव्हां मी तो कसा होईन ? -