( १५ ) नामरूपे इह प्रविष्टः अन्यैरदृष्टः स्वयं पश्यन् तथा श्रुतः शृण्वन् अमतो मन्वानोऽविज्ञातो विजानन् ' सर्वाणिरूपाणि विचि त्य धीरो नामानि कृत्वाभित्रदन् यदाऽस्ते ' इति । - अर्थः - मला जात, कुळ, संस्कार कसें लागत नाहीं. ' हा तुझा प्रश्न आहे त्याचें उत्तर ऐक. नाम आणि रूप ह्यांना प्रगट कर- णारा पण नामरूपाच्या धर्मापासून अलिप्त रहाणारा जो आत्मा, त्यानेंच नामरूप प्रगट करण्याकरितां हें शरीर निर्माण केले आणि संस्कार धर्मबाध आपल्याला न होऊं देतां ह्या नामरूपांत तो शि- रला. तो सर्व पहातो पण कोणाला दिसत नाहीं, तो सर्व ऐकतो पण त्याचें ज्ञान श्रवणेंद्रियाला होत नाहीं. तो सगळ्यांच्या विचा- रांचा प्रेरक आहे पण मनाला गोचर नाहीं, त्याला सर्वोचें ज्ञान आहे पण त्याची जाणीव कोणाला नाहीं. सर्व रूपावर आपली सत्ता गाजवून तो बुद्धिमान् आत्मा नांवें देऊन तसे ह्मणत रहातो. अस्मिन्नर्थे श्रुतयः सहस्रशः - 'तत्सृष्ट्वा । तदेवानुमा- अन्तः प्रविष्टः शास्ता जनानां - ८ विशत् ' स एष इद्द 26 प्रविष्टः एष व आत्मा स एतमेवं सीमानं विदयितया द्वारा प्रापद्यत' 'एष सर्वेषु भूतेषु गूढो ह्यात्मा' ' सेयं देवतैक्षत हन्ताहमिमास्तिस्रो देवता' इत्याद्याः श्रुतयः ॥ २३ ॥ - अर्थ – अशा अर्थाची हजारों श्रुतिवचनें आहेत. ते उत्पन्न करून त्यांतच तो शिरला. तो सृष्टीमध्ये शिरून लोकांना योग्य मार्गाला लावतो. तोच हा ह्यांत शिरतो. हाच तुझा आत्मा. तो ह्या कपाळाच्या चिरणीला फाडून ह्या [ ब्रह्मरंध्र ] ह्या मार्गाने आंत पोहोचला. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी हा आत्मा गुप्तरूपानें असतो. हीच तीदेवता हीच मी, हीच ह्या तिन्ही देवता. बगैरे श्रुतिवचनें आहेत. ,'
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२९
Appearance