(७) स यदि ब्रूयात् ब्राह्मणपुत्रः अदोन्वयः ब्रह्मचार्यासम् गृह- स्थोवा, इदानीमस्मि परमहंसपरिवाद संसारसागरात् जन्म- मृत्युमहाग्राहात् उत्तितीर्षुरिति ॥ १० ॥ अर्थ:- त्यांची समज पटली नसली तर तो ह्मणेल-महाराज, मी अमुक ब्राह्मणाच्या पोटीं अमक्या कुलांत जन्मास आलों, माझी मुंज झाली आहे, मी अविवाहित आहे, किंवा माझी बायकापोरें आहेत किंवा मी परमहंस दीक्षा घेण्याच्या तयारीत आहे, घरदार सोडलें आहे, त्या जन्ममरणरूपीं सुसरी असलेल्या संसारसमुद्रांतून मला आपण पार न्या. आचार्यो ब्रूयात् – इहैव तव सोम्य मृतस्य शरीरं वयो- भिरद्यते मृद्भाव वापद्यते । तत्र कथं संसारादुद्धर्तुमिच्छसि इति नहि नद्याः अवरे कूले भस्मीभूते नद्याः पारं तरिष्यसि इति ॥ ११ ॥ अर्थ- [ त्याच्या उत्तरावरून हा देहच मी असें ह्मणतो आहे तेव्हां] गुरु ह्मणतील - अरे बाबा, हे तुझे शरीर मरणानंतर [ उघड्यावर पडलें तर ] गिधाडें वगैरे पक्ष्यांच्या भक्षणाला उपयोगी पडेल, ( तें पुरले किंवा जाळलें तर ) त्याची माती होईल. तें ह्या संसा- रांतून पलीकडे जाणार कसें ? नदीच्या अलीकडच्या तीराला ह्याची राख झाल्यावर तूं पलीकडे जाणार कसा ? - स यदि ब्रूयात् अन्योऽहं शरीरात् । शरीरं तु जायते म्रिय ते वयोभिरते मृद्भावमापद्यते शस्त्राग्न्यादिभिश्च विनाश्यते व्याध्यादिभिव प्रयुज्यते । तस्मिन् अहं स्वकृतधमाधर्मकृत- वशात् पक्षी नीडमिव प्रविष्टः पुनः पुनः शरीरविनाशे धर्माधर्मवशात् शरीरान्तरं यास्यामि पूर्वनीडविनाशे पक्षीव नीडान्तरम् । -
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२१
Appearance