Jump to content

पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६ ) प्राणाच्या पलीकडे, मनाला न सांपडणारौं, आंत बाहेर सर्वत्र भर. लेला, जन्मरहित आहे. विज्ञान ( अनुभव ) पूर्ण आहे. तो सर्व ठिकाणी सारखा भरलेला, आंत बाहेर तोच आहे. माहीत असले- ल्या किंवा नसलेल्या वस्तूंहून निराळा आहे. आकाश एवढेंच त्याच्यासारखे आहे. अशा आणखी पुष्कळ श्रुती आहेत. - स्मृतिभिव-' न जायते न म्रियते, नादत्ते कस्यचित्पापम्, यथाऽकाशस्थितो नित्यं, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि, न सत्तन्नास- दुच्यते, अनादित्वान्निर्गुणत्वात्, समं सर्वेषु भूतेषु, उत्तमः पुरुषः इत्यादिभिः श्रुत्युक्तलक्षणाविरुद्धाभिः परमात्मासंसारित्वप्र- तिपादनपराभिः तस्य सर्वेणानन्यत्वप्रतिपादनपराभिश्च ॥८॥ अर्थः - त्याप्रमाणेच स्मृतीचेही आधार दाखवावे. ते अस आत्मा जन्मास येत नाहीं, मरत नाहीं, तो कोणाच्या पापाला अधिकारी नाहीं. ( येवढा मोठा वायु ) तो जसा आकाशांत असतो. मलाच क्षेत्रज्ञ समज. तें सतूही नव्हे आणि असतूही नव्हें. त्याला आदि ( आरंभ ) नाहीं, गुण नाहीं. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एक- सारखा; तोच उत्तम पुरुष ह्या प्रकारच्या श्रुतीत सांगितलेल्या अर्थाच्या, परमात्म्याला संसार लागू नाहीं असे सांगणान्या आणि तो सर्वत भरून आहे, निराळा नाहीं असें झणणाऱ्या स्मृतींचे आधार द्यावे. एवं श्रुतिस्मृतिभिः गृहीतपरमात्मलक्षणं शिष्यं संसार- सागरादुत्तितीर्षु पृच्छेत् कस्त्वमास सोम्येति ॥ ९ ॥ अर्थः - ह्याप्रमाणे श्रुति आणि स्मृति दोन्ही ठिकाणच्या वचनाचे आधार समजलेला शिष्य, संसार हा समुद्र आहे, ह्यांतून मला परती- राला जाण्याची इच्छा आहे असे ह्मणूं लागला असतां त्यास वि चारावें-- बेटा, तूं कोण आहेस ( याचा विचार केलास ) ? - . C e