(८) शिष्य ह्मणतोः— महाराज, मी शरीराहून निराळा आहे. ज न्माला येणे, मरण हे शरीराला लागू; पक्षी खातील शरीर, माती होईल शरीराची, शस्त्र किंवा विस्तव नाश करणार शरीराचा, आधी व्याधी होणार शरीराला, मी पूर्वजन्मी केलेल्या पापपुण्याप्र माणे, पक्षी घरट्यांत शिरतो, त्याप्रमाणं ह्या देहांत आलो आहे; अनेक वेळां शरीराचा नाश झाला तरी मी आपल्या चांगल्या वाईट कृत्याप्रमाणे दुसरे शरीर धारण करीन. एक घरटें मोडलें तर पक्षी जसा दुसन्या घरट्यांत जातो त्याप्रमाणेच माझे होईल. एवमेवाहमनादौ संसारे देवमनुष्यतिर्यङ्निरयस्थानेषु स्व कर्मवशात् उपात्तमुपात्तं शरीरं त्यजन् नवनवं चान्यदुपाददानो जन्ममरणप्रबंधच घटीयंत्रवत् स्वकर्मणा भ्राम्यमाणः क्रमे- दं शरीरमासाद्य संसारचक्रभ्रमणात् अस्मात् निर्विष्णो भगवंतमुपसन्नोऽस्मि संसारचक्रभ्रमणप्रशमाय | तस्मान्नित्य एवाहं शरीरादन्यः । शरीराणि आगच्छन्त्यपगच्छन्ति च वा सांसीव पुरुषस्येति ॥ १२ ॥ अर्थः-त्याप्रमाणे हे जग कर्धीपासून चालले आहे कोणास ठाऊक, ह्यांत मी आपल्या कर्माप्रमाणें, देव, मनुष्य, पशुपक्षी वगैरे योनीं- मध्ये त्यांच्या त्यांच्या लोकांत किंवा नरकांत, वारंवार शरीर धारण केलें, एक टाकून दुसरे घेतले. अशा तऱ्हेनें जन्ममरणाच्या ह्या रहाटगाडग्यावर फिरतां फिरतां हल्लीं दैवयोगार्ने ह्या शरीरांत आलों आहे. ह्या चक्राच्या फेन्यामुळे कंटाळून गेलों आहे. हें भ्रमण बंद कसे होईल तें सांगा ह्मणून आपल्या चरणाजवळ आलो आहे. ह्या शरीरापासून मी निराळा आहे. एक वस्त्र टाकून दुसरें ध्यावें, त्या- प्रमाणे हे देह येतात आणि जातात. -
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२२
Appearance