पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीपात बाबाजी ( ८३ ) यांच्या शिपायाने त्यांस सांगितले होतें कीं, ते लवकरच घरी येतील. ही वर्दी कर्नल फेर यांस त्यांच्या पटेवाल्यांनी दिल्याबरोबर ते आपल्या असिस्टंटास बरोबर घेऊन कापांतून निघाले आणि अपरात्री बळवंतराव देव यांच्या घरी येऊन ते कोठें आहेत म्हणून विचारले. घरच्या मनुष्यांनी सांगितले कीं, ते शहरांत रोषनाई पाहण्यासाठी गेले आहेत हें कर्नल फेर यांस खरे वाटले नाही. त्यांनी पुनः घरच्या मनुष्यांस धमकावून विचारले तेव्हांही त्यांस तेंच उत्तर मिळाले. नंतर श्रीपाद बाबाजी जवळ जाऊन त्यांस तुम्ही कांहीं खटपटीकरितां आला आहांत ह्मणून धमकाविले, आणि त्यावरून त्या दोघांचें बरेंच भाषण झाले. कर्नल फेर यांनी श्रीपाद बाबाजी यांस असे सांगितले की, तुम्ही देव यांस भेटल्या- वांचून चालते व्हा. त्यांच्या हुकमाप्रमाणे न गेलो तर तो अविचारी मनुष्य कांही जुलूम करण्यास चुकणार नाही असे श्रीपाद बाबाजी यांस वाटल्यावरून त्यांच्याशी कांही विशेष तक्रार न करतां ते चालते झाले. इतक्यांत बळवंतराव देव घरी आले तेव्हां त्यांस समजले की, आपल्या शोधाकरितां कोणी दोन साहेब आले होते. साहेब कोण, व कशा- करितां शोध करण्यास आले होते, याचा पूसतपास करीत आहेत इतक्यांत त्यांच्या आ कर्नल फेर आणि त्यांचे असिस्टंट बोवी आले. कर्नल फेर यांच्या विचारण्यावरून बळवंतराव देव यांणी श्रीपाद बाबाजीचा व आपला स्नेहसंबंध आहे, व त्यामुळे ते कधी बडोद्यास आले तर भेटीसाठर्टी येत असतात, व आजही आले आहेत, असे कळविले असतां, कर्नल फेर यांस तें खरें न वाटून तुम्ही कांहीं खटपटी करीत आहां असे ते बोलले. बळवंतराव देव यांणी उत्तर दिले कीं, आपणास सर्व खटपटीच दिसतात, पण आमची सर्व कामगारांची आपले आणि महाराजांचे कोणत्याही रीतीने सलूख होईल असे करावे. ही काय ती एकच खटपट आहे. हे मोकळ्या मनाचें आणि अगदीं सत्य भा- षण कर्नल फेर यांस खरें वाटले नाहीं. बळवंतराव देव यांणी कर्नल फेर यांस विचारले की, आपण येवढ्या अपरात्री माझ्या घरी आलांत याबद्दल महाराजांस आपण विचारले होते काय ? मी कांहीं खटपर्टीत आहे असे आपल्यास वाटले होते तर दुरबारांत यादी लिहून चौकशी करावयाची होती. आपल्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांनी तसे कांही महत्वाचे काम नसतां महाराजांच्या अमलांत स्वतः रात्रीच्या वेळी माझ्या घरी येणे उचित नव्हतें, व या योगाने लोकांच्या मनांत भलत्याच कल्पना येतील. हे बळवंतराव देव यांचे भाषण त्यांच्या मनास जांचलें. ते रागावून ह्मणाले की, याबद्दल दरबारांतून यादी ल्याहा म्हणजे आम्ही त्याचे उत्तर पाठवूं, आणि चालते झाले. श्रीपाद बाबाजींचा रेसिडेन्सीशी कांही संबंध नव्हता की, त्या दप्तरची कांही बातमी देण्याकरितां ते बळवंतराव देव यांस भेटतात अशी कल्पना करवेल. दुसरे इंग्रज सरकारच्या अम्मलदारांनी गायकवाड सरकारच्या अधिकाऱ्यांस भेटूं नये असा कांहीं इंग्रज सरकारांनी हुकूम फिरविला नव्हता कीं, श्रीपाद बाबाजीचें बळवंतराव देव यांच्या भेटीस जाणे हा एक अपराध झाला असता. बडोद्याच्या दरबारांत इंग्रज सरकार आपला रेसिडेंट ठेवू लागले तेव्हांपासून महाराजां- च्या अमलांत त्यांचा रुकार न घेतां अपरात्री कोणाच्या घराच्या हद्दीत कोणी रेसिडेंट