पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. अशा रीतीने शिरला होता असे एकही उदाहरण सांपडणार नाही. पण कर्नल फेर अगदीं विशृंखल झाले होते, आणि त्यांस कर्तव्याकर्तव्य कोणते हेच मुळीं समजत नव्हते. आणखी त्यांत आपण कांहीं जरी केले तरी मुंबई सरकार आपणास टपका देणार नाही अशी त्यांच्या मनाची पूर्ण खात्री झाली होती. मग ते मागे पुढे पाहतात कशाला !! माझ्या अमलांत माझ्या कामगारांच्या घरी अपरात्रीं तुम्ही कां गेलां होतां ? असे जर महाराजानी सरकारी नात्याने त्यांस विचारले असते तर त्यांच्याने त्यावर योग्य कारण सांगवले नसते; परंतु त्यांजबरोबर तक्रार करून त्यांस आपला ज्यास्त वैरी करून घेणें हें महाराजांच्या व त्यांच्या कामगारांच्या मनांत कर्धीही आले नाही म्हणून त्याबद्दल दरबारांतून कहिीं पत्रव्यवहार झाला नाहीं. कर्नल फेर यांच्या सूचनेवरून मुंबई सरकारानी श्रीपाद बाबाजी यांस मात्र एकदम मुरतेहून काढून कारवारास पाठविले, आणि असे करण्याचे प्रयो- जन काय म्हणून सरकारास त्यांनी विचारले असतां त्याबद्दल खुलासा सांगितला नाही. कर्नल फेर यांस मुंबई सरकार किती आधीन झाले होते हैं यावरून देखील कळून येते.