पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १२. श्रीपाद बाबाजी. श्रीपाद बाबाजीच्या संबंधानें कर्नल फेर यांचे वळवंतराव देव यांजबरोबर असभ्यपणाचें आणि गैरकायदेशीर वर्तन. सामान्य प्रतीच्या मनुष्यास देखील एखादी गोष्ट करण्याची असली म्हणजे अगोदर तो तिचें महत्व लक्षांत घेऊन ती करण्यास उचित आहे किंवा नाही याचा विचार करून मग उचित वाटले, तर ती करण्यास अनुसरतो अथवा टाकून देतो. त्या रीतीने पाहिले असतां कर्नल फेर यांचे प्रत्येक कृत्य त्यांच्या अधिकाराला शोभेल असे पवित्र, निर्मत्सर, आणि सद्विचारयुक्त असले पाहिजे होते; कारण की, त्यांचा हुद्दा कांहीं असा तसा नव्हता. गायकवाडाच्या दरबारांत ते ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधि होते, परंतु त्यांचें मन इतकें क्षीण होते की, त्यांस मल्हारराव महाराज यांच्या प्रतिपक्षीय लोकांनी महाराजांविषयों अथवा त्यांच्या कामगारांविषयों लावालावी करून कांहीं सांगितले म्हणजे त्यांस ते खरे वाटून त्यांत कांहीं तरी मोठे कारस्थान आहे असे त्यांस वाटत असे, आणि त्या योगाने त्यांच्यापासून अतिशय अविचाराचें व असभ्यपणाचें वर्तन होत असे. श्रीपाद बाबाजी यांच्या संबंधाने कर्नल फेरे यांणी जें वर्तन केले ते तशाच प्रकारचे आहे. श्रीपाद बाबाजी यांचा आणि बळवंतराव देव यांचा स्नेहसंबंध असल्यामुळे श्रीपाद बाबाजी एक वेळा सुरतेन बडोद्यास आले तेव्हां बळवंतराव देव यांच्या घरी भेटीस गेले होते. ही बातमी कोणी कर्नल फेरे यांस कळविली होती असे दिसते. त्यावांचून त्यांस काय माहित की श्रीपाद बाबाजी बळवंतराव देव यांच्या भेटीस जात असतात ? सन १८७३ च्या दीपावळीत मल्हारराव महाराज यांणीं कार्तिक शुद्ध १ स मोठा दीपोत्सव केला होता, आणि तो पाहण्यासाठी सुरत व अमदाबाद वगैरे जवळच्या शह- रांतले पुष्कळ लोक बडोद्यास आले होते. त्याच दिवशी कर्नल फेर मुंबईहून बडो- ते; आणि श्रीपाद बाबाजीही बडोद्यास येण्याकरितां सुरतेच्या स्टेशनावर त्याच गार्डीत बसले. कर्नल फेरे यांची भाऊ पुणेकर वगैरे बिनपगारी मंडळी हेर- पणाचें काम फार तत्परतेनें बजावीत होती यांत कांहीं संशय नाही. त्यांनी सुरतेच्या स्टेशनावरच कर्नल फेरे यांस श्रीपाद बाबाजी बडोद्यास जाण्याकरितां गाडीत बसले आहेत अशी सूचना दिली. बडोद्याच्या स्टेशनावर श्रीपाद बावाजी उतरल्याबरोबर कर्नल फेर यांनी दोन पटेवाले व एक कारकून, ते कोठे जातात याचा शोध करण्या- करितां योजिले. श्रीपाद बाबाजी रोषनाई पहात पहात बळवंतराव देव यांच्या घरी आले त्या वेळेस देव घरी नव्हते, सबब श्रीपाद बाबाजी गाडीतच बसून राहिले; कारण, देव