पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. लक्ष्मीबाई साहेब कांहीं महिनेपर्यंत एका निराळ्या वाड्यांत राहात असत. अश्वीन मासीं दस- प्याच्या मुहुर्ताने महाराजानी त्यांस वाजत गाजत राजवाड्यांत आणिल्या आणि त्यांचा सर्व इतमाम लग्नाच्या बायकोप्रमाणें ठेविला. गायकवाड यांचे कुलांत जसा काय हा एक कुलाचार- चपडून गेला आहे की, लग्नाच्या बायकोखेरीज आणखी उपस्त्रिया कराव्या, परंतु त्यांचा इतमाम खाशा स्त्रियाप्रमाणे नसे. पण लक्ष्मीबाई साहेबांच्या इतमामांत आणि राणी ह्याळसाबाई साहेबांच्या इतमामांत कांहीं अंतर नसे. लक्ष्मीबाई साहेबांचें कुल कोणते याविषयों नक्की माहिती नाही. त्यांच्या बापास रखमाजीराव जाधव म्हणत, यावरून त्या जाधव कुलोत्पन्न म्हटले पाहिजे, परंतु गायकवाड यांचे सोयरेधायरे आणि दुसरे कुलवान मराठे यांचे असे म्हणणे होतें कीं, ही मुलगी सत्कुलांतली नाहीं; महाराजानी तिजबरोबर लग्न केल्यानंतर त्याबद्दल ज्ञातीच्या संबंधाने बराच वाढला होता त्याजविषय पुढे सांगण्यांत येईल. इतकें खचीत आहे कीं, गायकवाडा- च्या राजपुरुषानें त्यांजबरोबर लग्न करावें अशा सत्कुलांत त्यांचा जन्म झाला होता असा कांहीं खात्रीपूर्वक पुरावा नव्हता. कज्या मल्हारराव महाराज यांच्या आणि कर्नल फेर साहेब यांच्यामध्ये ज्यास्त विपट पड ण्यांत आणखी लक्ष्मीबाई साहेब कारण झाल्या. महाराजानी त्यांजबरोबर लग्न करण्याचा निश्चय केला त्या वेळेस रेसिडेंटांकडून ज्या हरकती झाल्या त्यापासून तर मल्हारराव महाराज आणि कर्नल फेर यांचें मनस्वीच वैमनस्य पडले, परंतु त्यापूर्वी देखील लक्ष्मी- बाई साहेबांच्या संबंधाने उभयतांचे विशेष वैर वाढण्यास कारण झाले होतें. A कर्नल फेर साहेब याणी लक्ष्मीबाई साहेब यांस लष्करी मान द्यावा, आणि त्यांच्या मडम साहेबांची त्यांची भेट होऊन राणी ह्याळसाबाई साहेबांप्रमाणे त्यांचा आदर सत्कार करावा असे मल्हारराव महाराज यांच्या मनांत होतें, व त्याबद्दल त्यानीं शेसिडेंट साहेब यांजवळ गोष्टही काढली होती. कर्नल फेर याण त्यांस असे उत्तर दिले कीं, राणी ह्याळसाबाई साहेब यांस भेटून त्यांचा आदरसत्कार करण्यास माझ्या मडम साहेब हजार वेळां तयार आहेत, पण लक्ष्मीबाई साहेब यांची त्या भेट घेऊं शकत नाहीत. ११.