पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. नारायणभाई यांस सस्पिड करून दरबार बंद केले होतें, परंतु त्यास थोडे दिवस लाटेले नाहीत तोच नारायणभाई पुनः दरबारांत येऊं लागले. रेसिडेंट साहेब यांची मर्जी प्रसन्न करून घेण्यासाठी महाराज जर आपल्या काम- दारांस काढून देऊं लागले तर त्यापासून दरबारांतील सर्व कामदार मंडळीस आणि त्यांत विशेषेकरून जे प्रमुखत्वेकरून काम करीत होते त्यांस आपल्या स्थितीविषयों चिंता प्राप्त होणें हें स्वाभाविक होतें, आणि त्यावरून अशीही सहज कल्पना करितां येईल की, नारायणभाई यांस पुनः दरबारांत आणण्याविषयी सर्व कामदार मंडळींनी महाराजांचे मन वळविले असेल, परंतु तसे मुळींच घडले नाही. नानासाहेब खानवेलकर आणि हरीबा गायकवाड यांनी महाराजांस याबद्दल कांही सांगितले असेल तर नकळे, परंतु इतर कामदार मंडळीस तर नारायणभाईचा दरबारांत पुनः प्रवेश झाला हें अगदी प्रशस्त वाटले नाहीं. महाराज रेसिडेंट साहेब यांचे एकही वचन समग्रतेने पाळीत नाहींत, तेव्हां त्यांच्या राज्याचा परिणाम होणार तरी काय या- जविषयीं त्यांस ज्यास्त काळजी उत्पन्न झाली, आणि दुसरे नारायणभाई यांस महारा- जांच्या संतोषाने दरबारांतून पाय काढून घेण्याची उत्तम संधी सांपडली असतां ती ते व्यर्थ घालवितात याबद्दल कामदार मंडळीस वाईट वाटले. कारण की, अशा संधीची अपेक्षा करीत असतांही महाराजांची गैरमर्जी करून घेतल्यावांचून ती त्यांस साधतां येत नव्हती. ह्या गृहस्थानें त्या उत्तम संधीचा लाभ घेऊन स्वस्तपणे आपल्या घरी प्रयाण केलें असतें, तर त्यास अपमानाचे व प्रतिबंधाचे दुःख आणि द्रव्य दंडाची हानि सोसावी लागली नसती. अमर्याद स्वार्थपरायण पुरुष लोभांध होऊन असेच फाशांत पडत आले आहेत. तेथे एकटया नारायणभाईवर तो काय टपका. ठेवावा. नारायणभाई यांस पुनः दरबारांत येऊं दिल्यापासून कर्नल फेर यांजबरोबर महारा जांची मैत्री व्हावी, अशी दरबारी कामदार मंडळींत ज्यांस इच्छा होती ते आतां अगदींच निराश झाले, आणि मल्हाराव महाराज यांच्या राज्यकारभाराशी त्यांचा नौकरीच्या नात्याने जो संबंध होता त्यापासून त्यांजवर येऊन पडणाऱ्या विपत्ति सोस- ण्यास ते आतां तयार झाले. मल्हारराव महाराज यांची अवकृपा करून घेतल्यावाचून त्यांस दरबारांतून आंग काढून घेतां येत नव्हतें, व आपल्या संरक्षणासाठी महाराज यांच्या विरुद्ध त्यांस काहीएक कर्तव्य नव्हते. तेव्हां अर्थातच शेवटपर्यंत त्यांचा आश्रय करून राहणे हे त्यांस उचित वाटले होतें. सन १८७३ च्या आक्टोबर महिन्यांत मल्हारराव महाराज याणी लक्ष्मीबाई नांवाची एक कुमारिका हिजबरोबर गांधर्व विवाह केला. असे म्हणतात की, या बाईसाहेब सुरतेस काप- साच्या एका कारखान्यांत आपल्या आई बापाबरोबर मजूरी करीत होत्या. बडोद्यास त्यांस कोणी आणिले आणि महाराजांबरोबर त्यांचा योग कोणी घडवून दिला, हें कही समजत नाहीं.