पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. कोण कोणती चांगली कामे प्रजेच्या हितासाठी केलीं, व पुढे आपण काय करणार आहोत ते लिहून शेवटी आपल्या राज्याचा अधिकार आपण आपल्याकडेसच ठेविला आहे, या अर्याची सूचक कांही वाक्ये लिहिली. याप्रमाणे महाराजांचें रेसिडेंट साहेबांशी सख्य करून देण्यासाठी कामदारांनी रचलेला पाया मल्हारराव यानी एका क्षणांत ढासळून टाकिला. महाराजानी रेसिडेंट साहेब यांजकडे जाऊन त्यांची पायधरणी करावी आणि रेसिडेंट साहेब यानीं त्यांचे शांतवन करावे असा क्रम चालू होता, परंतु दोघेही आपल्यास जें कर्तव्य होतें तें करीत असत. सडेंट ब एके दिवशी मल्हारराव महाराज आणि रेसिडेंट साहेब यांचे मोठ्या निकराचें भांडण झाले. मल्हारराव महाराजांच्या प्रजेस रेसिडेंट साहेब यानी आश्रय दिल्यामुळे महाराजांचा दिवसानुदिवस बोज कमी होत चालला होता. त्यांच्या अंमलदारांस प्रजा अगदी अनावर झाली होती, यामुळे मल्हारराव महाराज अगदीं त्रासले होते. यांस ते असे म्हणाले की, तुम्ही माझ्या प्रजेस चिथावून देऊन दंगा करावयास लावले आहे यामुळे माझ्या राज्यकारभारांत घोटाळा झाला आहे. हे महाराजांचे वाक्य विषाप्रमाणे रेसिडेंट साहेब यांचे अंत:करणास झोंबले, आणि ते रागाने महाराजांस म्हणाले की, तुम्ही अनीतीचें वर्तन करिता आणि त्याचा दोष मजवर देता हे चांगले नाहीं. आम्ही साहेब लोक आहोत, आमच्या बरोबर कलह करण्यांत तुमचा टिकाव लागावयाचा नाहीं. तुमची मर्जी असेल तर तुम्ही याबद्दल मुंबई सरकारास खलिता लिहा आणि तुमची गाडी मागवून माझे बंगल्यांतून चालते व्हा, हे कठोर शब्द महाराजांस सहन झाले नाहींत. ते लागलेच रागानें रेसिडेंट साहेब यांच्या बंगल्यांतून बाहेर पडले. या वेळेस रावसाहेब बापुभाई दयाशंकर महाराजांबरोबर होते त्यानी उभयतांमध्ये मध्यस्ती करून तो कलह मिटविला. महाराजांनीं झालेल्या वादविवादाबद्दल जेव्हां दरबारच्या कामदार मंडळीस मजकूर सांगितला तेव्हां त्यांस उभयपक्षों जो अप्रयोजकपणा झाला त्याबद्दल फार खेद वाटला, परंतु महा- राजांस ज्या नीच लोकांनी वेष्टिले होते त्यांपैकी एकाने तर त्या धारिष्टाबद्दल महाराजांची मोठी प्रशंसा केली. नानासाहेब पहिले आणि तिसरे यांनी मनस्वी पैसा जमा केला आहे असे रेसिडेंट साहेब महा- राजांस नेहेमी सांगत. हरीवा गायकवाड यांजविषयों रेसिडेंट यांस असे वाटत असे की, महाराजांच्या दुर्व्यसनाचे मूळ बीज काय तो हरीबाच आहे. रेसिडेंट साहेब यांचा विशेष कटाक्ष काय तो तीन असामीवर होता. खानवेलकर, हरीबा गायकवाड, आणि नारायणभाई ललुभाई. नानासाहेब खानवेलकर हा माझा मेहुणा आहे, यास्तव त्याच्याविषयों रेसिडेंट साहेब यांनी कांहीं बोलूं नये असे मल्हारराव महाराज यांचे रेसिडेंट साहेब यांस सांग- णे असे, आणि दुसऱ्याविषयीं त्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्यास आहोत असे ते दाखवीत; आणि त्याप्रमाणे आपण वागतो असे दाखविण्यासाठी त्यानीं आपण तत्पर