पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. संबंध घडावा म्हणून प्रयत्न चालू केला आणि महाराजांचे असे मन वळविले की, त्यानी रेसिडेंट साहेब यांच्या सल्लया प्रमाणे राज्यकारभार चालवावा. जे कामदार रेसिडेंट साहेब यांस पसंत नसतील ते महाराजानी ताबडतोब काढून द्यावे आणि जे रेसिडेंट साहेब यांस पसंत असतील त्यांस कामावर नेमावे. आणि त्याप्रमाणे तारीख १८ आगस्ट सन १८७३ रोजी महाराज आपल्या कामदारांस घेऊन रेसिडेंट साहेब यांजकडे गेले, आणि त्यांनी त्यांस असे सांगितलें कीं, आज पासून आपण जशी सला द्याल त्याप्रमाणे ही कामदार मंडळी आपआपली कामे बजावितील, त्यांत जर हे कसूर करतील तर त्यांस बर्तर्फ करण्यांत येईल. कामदार मंडळीसही रेसि- डेंट साहेब यांचे समक्ष अशी ताकीद केली की, तुम्हीं रेसिडेंट साहेब यांच्या विचाराप्रमाणे काम केले नाहीं तर तुम्हास दूर करण्यांत येईल. * दरबारच्या कामदार मंडळीस अशी आशा उत्पन्न झाली की, आतां कांहीं सुरळीत चालेल, परंतु ती त्यांची आशा लवकरच नष्ट झाली. सदहू तारखेसच रेसिडेंट यानी महालानिहाय सरसुभे व फौजदारीचे मुख्य अधिकारी यांस कांही कामाबद्दल परभारे चिट्ठया लिहिल्या होत्या. त्यांतील मजकुराचा झोंक कांही असा नव्हता की, जसा काय सर्व राज्यकारभार महाराजानी रेसिडेंट साहेब यांस कुलमुक्त्यारी देऊन सोपला असे महाराजांस वाटावें. पण दिवाणाच्या नांवे किंवा महारा- जांच्या नांवें पत्रव्यवहार करण्याचा शिरस्ता असतां रेसिडेंट साहेव यानी इतर अधिकाऱ्यां शीं पत्रव्यवहार केला इतक्याने मल्हारराव महाराज यांस आज आपण आपला अधिकार गमावून आलो असे वाटलें. रेसिडेंट साहेब यानीं महाराज बोलल्याप्रमाणे चालतात किंवा नाही याची परीक्षा पाहण्याकरितां फार उतावेळ केली. बडोद्याच्या राष्ट्राच्या दुर्दैवानें सगळाच घाट ठीक जमला होता !! महाराजानी रेसिडेंट साहेब यांस कुलमुक्त्यारीने राज्यकारभाराची सोपवणूक केली होती, असा त्यांबरोबर केलेल्या भाषणाचा विक अर्थ नव्हता. पण त्या अस्थिर मनाच्या राजास तसे वाटले, आणि रेसिडेंट साहेब यानी आपणास महाराजानी राज्यकारभार सोपिला असा मुंबई सरकारास रिपोर्ट केला असेल, अशी कल्पना करून मुंबई सरकारास तारीख २५ आगस्ट सन १८७३ रोजी एक खलिता लिहिला, त्यांत आपण राज्यपदास पावल्यावर यापासून कर्नल फेर साहेब यांस बरेंच समाधान वाटले होतें असें त्यानीं तारीख १९ आगस्ट सन १८७३ रोजों मुंबई सरकारास रिपोर्ट केला होता त्यावरून दिसतें. त्याच संबंधानें त्यानीं तारीख २१ आगस्ट रोजों रिपोर्ट केला होता, त्याच्या चौथ्या कलमांत तर असे लिहिले होते कीं, राज्यांत सुधारणा करण्याविषय महाराजांची इच्छा आहे आणि त्यांच्या मनमोकळेपणा विषयों मला कांहीं संशय नाहीं. एका ब्रह्मचान्याच्या मोकदम्यांत आणि दुतन्या साधारण मोकदम्यांत महाराजानों न्याय केला आहे.

महाराज आपल्या तंत्रानें वागतात असे कर्नल फेर यांस वाटले तेव्हां त्यांच्या पेनाच्या आग्रांतून काय ती वर लिहिल्याप्रमाणे शुभ वर्णमालिका निघाली आहे. एकंदर पत्रव्यवहारांत महाराजांच्या कपाळी चांगली अक्षरें लागलीं तीं येवढींच. ब्ल्यू. बुक नंबर १ पान २६-२९ पहा.