पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ मल्हारराव महाराज किती जरी गैरसमजुतीचे होते तरी त्यांचा दिवाण चांगला असता तर महाराजांचे राज्यास कधींही अपाय झाला नसता. कारण कीं, त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये मल्हारराव महाराज यानी खद्द जातीने केलेल्या वाईट गोष्टी झाकल्या गेल्या असत्या; परंतु बडोद्याच्या राष्ट्राच्या दुर्दैवामुळे तो दिवाण अगढ़ी वाईट चालीचा होता, आणि सर्व अव्यवस्थेचें बीज काय तें तोच होता. नजराणा घेऊन महाल इजाऱ्याने देणे व त्यास कांहीं महिने झाले नाहींत तोच दुसऱ्यापासून नजराणा घेऊन तोच महाल दुसऱ्यास देणें हें दिवाणाचे कृत्य सतत चालू होतें. त्याने तालुक्यांतील अनेक लोकांची इनामें व मिळकती जप्त करविल्या होत्या आणि त्याबद्दल त्यास कांहीं रुपये मिळाले म्हणजे लागलीच तो त्याचा खुलासा करीत असे. बहुत करून सर्व तालुके त्याने आपल्या ताब्यांत घेतले होते, वहिवाटदार तोच नेमीत असे. कामांत बिलकूल दखल ठेविली नव्हती, रांत कोणास माहीत देखील पडत नसे. या त्याच्या कृत्यापासून रयतेपेक्षां राजास ज्यास्त नुकसान होत असे. इजारदारांनी खानवेलकर यास नजराण्याबद्दल सावकाराकडून रुपये आणून द्यावे आणि महालांचा चार्ज मिळाल्या बरोबर महालांच्या तिजोरींतून ते रुपये सावकारांस द्यावे अशी अंधाधुंदी चालली हीं त्या दिवाणाची सर्व कृत्ये महाराजांच्या कानावर नेली होती व त्याजला ही कान उघ- डून सांगितले होतें, परंतु त्या अनुतापविमुख लोभ्याच्या मनावर कांहीं ठसा उठला खरोखर इसाबानतींतील हेवेखोर आणि लोभी ह्या गोष्टीप्रमाणे * आपल्यास महालांच्या होती. नव्हता. कांहीं उपद्रव करून घेऊन या लोभी दिवाणाचा समूळ नाश करणारा असा कोणी तरी हे- वेखोर त्या समयास बडोद्याच्या दरबारांत पाहिजे होता. त्या खेरीज त्याचे निवारण करण्यास दुसरा काही उपायच नव्हता. व महालांचे त्याने महालचे ते दरबा- महालानिहाय सरसुभे यांची यामुळे तो जे काही करीत असे महाराजांच्या वृत्तीत कदाचित फेर पडेल, अशी दरबारच्या कामदार मंडळीस आशा होती, परंतु खानवेलकर याच्या आचरणांत कांहीं तफावत पडेल अशी आशा मुळींच नव्हती. सबब त्यांनीं रेसिडेंट साहेब आणि मल्हारराव महाराज यांच्या मध्ये मित्राचाराचा लोभी मनुष्यास

  • ही गोष्ट अशी आहे कीं, एका प्रसंगी हेवेखोर आणि लोभी असे दोघे एकच ठिकाण बसून

तप करीत होते. ईश्वरास त्या नीच मनुष्यांची सेवा घेणें आवडलें नाहीं, त्यानें आपल्या एका दूतास आज्ञा केली की, तू त्यांजकडे जा, आणि त्यांची इच्छा काय आहे याचा शोध करून तुला योग्य वाटेल तें त्यांस दे. तो दूत त्यांजकडे आला आणि म्हणाला कीं, ईश्वरानें वर देण्यासाठीं मला तुम्हाकडे पाठविलें आहे, पण मी तुम्हांस निरनिराळे वर देण्याच्या पंचायतींत पडत नाहीं. तुम्हांपैकीं एक पहिल्यानें जे काहीं मागेल त्याच्या दुप्पट दुसन्यास मिळेल. अनेक वस्तु मागावयाच्या होत्या, परंतु त्यानें आपले मन अवरून धरिलें. कीं, माझा सोबती जें कांहीं मागेल त्याच्या दुप्पट मला मिळेल, आणि मनुष्यांच्या इच्छा येथून तेथून सारख्याच आहेत. हेवेखोर मनुष्यास हो उत्तम संधी सांपडली. त्याने कांहीं काकूं न करितां दूताजवळ असा वर मागितला कों, माझा एक डोळा जाऊं दे. त्यास माहित होतें कीं, माझा तर एक डोळा जाईल पण माझा सोवती दोन्हीं टोळ्यांनी अधळा होईल. तो मनांत म्हणाला