पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभारांतील अव्यवस्थेबद्दल रेसिडेंटाकडून जे दोषारोप करण्यांत येत होते त्यांत इंग्रज सरकारच्या मुलखास व प्रजेस उपद्रव दिल्याबद्दल व बडोद्याच्या कापांतील ब्रिटिश सरकारच्या युरोपियन आफिसरांचा अपमान केल्याबद्दलचेही आरोप होते. डाक्तर सिवर्ड यांस महाराजांच्या स्वारींतील स्वाराने "तुमची गाडी बाजूस उभी करून महाराजांस मान द्या" असे दरडावून सांगितल्याबद्दल आरोप आणण्यांत आला होता. महाराजांचें असें ह्मणणे होतें कीं, माझ्या स्वाराने अशी बेअदबी केली नाहीं, व स्वारही या गोष्टीस नाकबल होता. लोकांनी राजास सलाम केला असतां राजाचें जर तिकडे लक्ष्य न गेले तर चोपदार महाराजांस तिकडे लक्ष्य द्या म्हणून सुचना करतात, परंतु महाराजांस तुम्ही सलाम करा किंवा मान द्या असे लोकांस सांगण्याचें स्वाराचे तर काम नाही असे असतां डाक्तर सिवर्ड साहेब यांस स्वारानें असे कसे म्हटले असेल तें नकळे. महाराजांस तुम्ही सलाम करा असे म्हणणें हें स्वार लोकांस उलटें बेअब्रूचे वाटते. त्यांनी फार झाले तर त्यामधून तुमची गाडी बाजूस घ्या असे त्यांस म्हटले असेल, आणि भाषेच्या अनभिज्ञतेमुळे त्यांची कांहीं उलटी समजूत झाली असेल तर नकळे. वाद नामदार गव्हरनर जनरलपर्यंत गेला, आणि त्याबद्दल त्यांनी हा असा हुकूम केला कीं, महाराजांनी दरबारांतील योग्यतेच्या कामगारास दहा स्वारा- सहीत डाक्तर सिवर्ड साहेब यांजकडे पाठवून माफी मागावी. त्याप्रमाणे महाराजांनी बापु भाई दयाशंकर ह्यांस दहा स्वारानिशी पाठवून माफी मागितली. असा हुकूम करण्यांत गव्हरनर जनरलचा असा हेतु असेल की, स्वार लोकांनी केलेल्या अपमाना- बद्दल त्यांच्या धन्यास माफी मागावी लागली हे सर्व स्वारांस जाहीर व्हावें. मल्हारराव महाराजांचें प्रजेच्या हिताकडे लक्ष्य नव्हते व त्यांचा दिवाण तर द्रव्य सं- पादन करण्याशिवाय आपले दुसरे कांहीं कर्तव्यकर्म आहे असे समजतच नसे. अशी जेथें राज्यव्यवस्था होती तेथें रेसिडेंट साहेब याजबद्दल मुंबई सरकारापर्यंत अथवा इंडिया सरका- रापर्यंत गाऱ्हाणे नेण्यापेक्षां महाराजानी रेसिडेंट साहेब यांच्या सल्याप्रमाणे राज्यकारभारांत सुधारणा करावी, आणि त्यानीं महाराजांचा त्यांच्या प्रजेवरील बोज कमी न होईल अशा- रीतीने त्यांच्याशी वर्तणूक ठेवावी अशा घाटावर गोष्ट आणणे हाच काय तो उत्तम उपाय होता. महाराजानी कर्नल फेर साहेब यांजकडे रावसाहेब बापूभाई दयाशंकर आणि गोविंदराव केशव जवळेकर यांचे जाणेयेणे होतें. कर्नल फेर यांच्या भाषणावरून त्यांस असे दिसून आले होतें कीं, त्यांचे मनांत राजाविषयों कांहीं द्वेषभाव नाहीं, आपले राज्य न्यायाने करावें येवढाच कायतो त्यांचा हेतु होता; परंतु मुंबईसरकाराबरोबर कर्नल फेर यानीं केलेल्या पत्रव्यवहारांत असे कोठे दिसत नाहीं कीं, त्यानीं सौम्य उपा- यांची योजना करण्याविषयीं मुंबई सरकारास सूचना करून मल्हारराव यांजवर मुंबई सरकारानी त्यांच्या वाईट राज्यकारभाराबद्दल क्षमा करावी असे लिहिले होतें.