पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या अपकर्षास आरंभ. घातले आहे की काय हा संशय त्यांस असेच, आणि म्हणून त्यांचे वचवचीत भोजन इतकें चमत्कारिक असे कीं, त्याचा पाहणारास तिटकारा येई. हें फटके मारण्याचे अघोर कृत्य ज्या दिवशीं कर्नल फेरे बडोद्यास दाखल झाले त्याच दिवशीं घडले होते आणि त्याबद्दल लागलीच त्यांजकडून दरबारांत यादी आली. तिचे उत्तर लिहितांना एका कामदाराने महाराजांस असे सांगितलें कीं, लार्ड मेयोसारख्या गवरनर जनरलचा एका दुष्ट कैद्याने प्राण घेतला असतांही त्याचा न्याय शांतपणे व रीतीने ज्या सरकारांनी केला त्या सरकारास तुमचा विश्वासु खिजमतगार विष देऊन मारला, सबब त्या लोकांवर तुम्हास असा जुलूम करावा लागला ही सवब कशी मान्य होईल ? परंतु त्याबद्दल त्या अविचारी राजास कांहीं अनुताप झाला होता असे दिसले नाहीं. रेसिडेंटाच्या सदहू यादीपासून महाराजांवर त्यांच्या राज्यकारभारांतील अव्यवस्थेबद्दल दोषारोप होण्यास आरंभ झाला. कर्नल फेर साहेब यांची पत्रव्यवहराची रीत फार असभ्यपणाची होती. “रानवट रीतीच्या कायद्याप्रमाणे तुम्ही राज्य चालवितां " असे अप्रयोजक आणि अपमानजनक शब्द ते बेलाशक महाराजांच्या यादींत लिहीत असत व एकाद्या वेळेस अमुक तासांत यादीचा जबाब पाठवावा अशा मुदती नेमीत. मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांतील दोषांकडे पाहिले असतां कर्नल फेर यांस विशेष संताप येण्यासारखे महाराजांचें आणि विशेषेकरून त्यांचा दिवाण खानवेलकर याचें आचरण होतें, परंतु पत्रव्यवहार ठेविण्यांत जी प्रौढीची रीत चालत होती तिचा कर्नल फेर साहेब यानी त्याग करून जी रीत स्वीकारिली होती ती ब्रिटिश सरकारच्या रोसिडेंटास योग्य नव्हती. जोपर्यंत मल्हारराव महाराज बडोद्याचे राजे असे मानिलें होतें तोपर्यंत अशा रीतीच्या पत्रव्यवहाराबद्दल खरोखर रेसिडेंट साहेब त्यांच्या वरिष्ठांच्या टपक्यास पात्र होते पण टपका देतो कोण ! ! ● मल्हारराव महाराज आठवड्यांतून दोन वेळां, सोमवारी आणि गुरुवारी, रेसिडेंट साहेब यांच्या भेटीसाठी जात असत, व रविवार खेरीज करून दिवाणाचें नित्य जाणे असे. रेसिडेंट साहेब याणी एकाच कामाबद्दल दोघांसही विचारले म्हणजे दोघांपासूनही त्याबद्दल निरनिराळी उत्तरे मिळत, यामुळे खरें कोणते हें समजण्यास रेसिडेंटास पंचाईत पडे. त्याच कामाबद्दल लेखी जबाब पाठविण्याचा झाला ह्मणजे तो तयार करणाऱ्या कामगारास मोठी अडचण पडत असे. महाराजांनी रेसिडेंटाबरोबर अगदी जरूरीच्या कामाखेरीज दळ- णवळण ठेवूंपूर्वीच्या राजांनीही ठेविले नव्हते म्हणून महाराजांस कामदार मंडळींनी सुचना केली होती परंतु ती त्यांस पसंत वाटली नाही. आपण जर रेसिडेंट साहेब यांजबरोबर साक्षात संबंध न ठेविला तर आपणास कामगारांच्या तंत्राने वागावे लागेल असे त्यांस वाटत असे, परंतु अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपणावर सर्व राज्यकारभाराची जबाबदारी घेणे किती कठीण होतें हें त्यांस कळेना. बडोद्याच्या दरबारांत निरक्षर मराठ्यास दिवाणगिरीच्या हुद्याची आणि राजास स्वतः रोसडेंटाबरोबर दळणवळण ठेवि ण्याची इच्छा उत्पन्न झाल्यापासूनच बडोद्याच्या राज्यास कीड लागली.