पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मनस्ची मारले. त्या लोकांनी शेवटी आपण सोमल घालवून तात्या पवार ह्याचा प्राण घेतला असे कबूल केले. माराच्या भयाने अपराध कबूल केला किंवा त्यांनी खरोखराध केला होता याविषयों निश्चयाने काही सांगतां येत नाही, पण त्या लोकांनी सोमल मिळविला होता हे खरे आहे, त्याचा त्यांनी याच कामाकडेस उप- योग केला किंवा कसे याविषयी मात्र निश्चितपणे सांगतां येत नाहीं. तात्या पवार याचें प्रेत दहन केल्यानंतर विषप्रयोगाविषयी संशय आला होता. तो मेला त्या दिवशीं सारा दिवस रंगाच्या गारठ्यांत होता, आणि रात्री मनस्वी दारू प्याला होता त्यापासून त्याचे मरण झाले असेल तर तसाही संभव होता. आरोपी लोकांस जन्म ठेपेची शिक्षा देऊन जेव्हां तुरुंगांत पाठविले तेव्हां शहरच्या चार दरवाज्यांजवळ त्यांस आणखी फटके मारावे ह्मणूनही महाराजांनी हुकूम केला होता, आणि हुकुमाप्रमाणे फौजदारीचे अधिकारी अम्मल बजावितात किंवा नाही हे पाहण्याकरितां आपल्या खानगी मंडळीपैकी खासेराव जगताप वगैरे मंडळीस गुप्तपणे पाठविले होतें. अगोदरच गुन्हा कबूल करण्यासाठी त्या लोकांस फार मार दिला होताच, आणि आणखी तुरुंगांत नेतांना त्यांस पुनः फटके मारिले, यामुळे त्यांपैकी एक मनुष्य तात्काळ मेला. त्या आरोपी लोकांनी प्रथम एका वाण्याच्या गुमास्त्याचें खोटेंच नांव घेऊन त्याजकडून सोमल आणिला म्हणून सांगितले होते, परंतु पुढे नुरुद्दीन * बोहोऱ्याचे दुकानांतून त्याचे गुमास्त्याजवळून सोमल आणिला असे सांगितले, व त्या गुमास्त्यानेही मी सोमल दिला असे कबूल केले. याप्रमाणे तो वाण्याचा गुमास्ता निर- पराधी ठरला असतांही त्यास फटके मारून तुरुंगांत पाठविले होतें ! नुरुद्दीन बोहरी यांजपासून त्याने परवान्यावांचून दुकानांत सोमल ठेविला हें निमित्त ठेवून पांच हजार रुपये दंड घेतला. हे न्यायाचे काम मल्हारराव महाराज यानीं चार घटकेत आटपलें: दिवाण, हरीबादादा, आणि फौजदारीचे मुख्य अधिकारी यांजाशवाय दुसऱ्या दरबारच्या काम- दारांस तर फटके मारतांना एक मनुष्य मेल्यावर ही बातमी कळली. या निर्दयपणाबद्दल मल्हारराव महाराज यांची निंदा करितांना जितक्या निष्ठुर व कर्णकटु शब्दांची योजना करावी तितकी थोडी आहे. मल्हारराव महाराज यांस असा संशय आला होता की, माझ्या विश्वासु खिजमतगारास बुद्धिपुरःसर विष घालून मारण्यांत त्या मारणारांचा माझ्या जीविताला अपाय करण्याचा कांहीं हेतु असावा. महाराज हे अतिशय वाहमी होते. त्यांस आपल्यास कोणी विषप्रयोग करून मारील की काय याविषयों मोठे भय वाटत असे, आणि म्हणून ते भरंवशाच्या मनुष्याखेरीज दुसऱ्याने तयार केलेले अन्न खात नसत व दुसऱ्याच्या हातचे पाणी पीत नसत. महाराजांच्या भोजनासाठी जे कांही पदार्थ तयार होत असत ते सर्व त्यांच्या खाजगी मंडळीपैकी शाळिग्राम नावाचा एक मारवाडी फार भरंवशाचा होता तो खाऊन पाहात असे, आणि त्यानंतर महाराज भोजन करीत. तथापिसुद्धां आपल्या अन्नांत विष

  • कर्नल फेर साहेब यांस विषप्रयोग करण्यासाठी ज्याजपासून सोमल आणिला ह्मणून दामोदरपंत

नेने यानें कमिशनापुढे साक्ष दिली व ज्यास मल्हारराव महाराज यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी पोलिसानें कैद करून ठेविले होते व ज्यास बडोद्यांतून काढून दिले आहे तोच हा नुरुद्दीन बोहरा.